

जळगाव : जळगाव जिल्ह्यामधील संपूर्ण आशिया खंडामध्ये प्रसिद्ध असलेल्या जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीला 23 तारखेपासून नामनिर्देशन पत्र भरले जाणार आहे आज घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये उमेदवारांनी बाकी नसल्याचा दाखला कधीपर्यंत मिळेल या प्रश्नावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी बगल देत लवकरच मिळेल असे सांगून वेळ मारून नेली.
जळगाव महानगरपालिकेच्या नामनिर्देशन पत्र भरण्यापूर्वी उमेदवारांना काही शंका कुशंका असल्यास यासंदर्भात आज महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित नितीन बर्डे यांनी प्रश्न उपस्थित केला की पहिल्या दिवसापासून थकबाकी नसल्याचा साठी अर्ज केलेला आहे
मात्र अद्यापही थकबाकी नसल्याचा दाखला मिळालेला नाही तो केव्हा मिळेल याचे उत्तर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी सांगितले की लवकरच थकबाकी नसल्याचा दाखला देण्याची व्यवस्था करून मात्र तो कधी मिळेल व केव्हा मिळेल याबाबत त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही.
एवढे उपस्थित अनेकांनी प्रश्न उपस्थित केले त्याला प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी निवडणूक आयोगाच्या नियमाने समजून सांगितले.