Busawal Crime | महावितरणच्या वसुलीला गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला भरचौकात अश्लील शिवीगाळ; खंडाळ्यात 'बाबूशेठ'ची अरेरावी!

MSEDCL Recovery खंडाळे (ता. भुसावळ) येथील घटनेने महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप; भुसावळ ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
Electricity bill recovery drive
महावितरणचा वीज बिल थकबाकीदारांना दणकाPudhari
Published on
Updated on

Mahavitaran Woman Employee Harassment

जळगाव : मार्च एंडिंगच्या निमित्ताने थकीत वीज बिल वसुलीसाठी रात्रंदिवस एक करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आता ग्राहकांच्या रोषाला आणि विकृत मानसिकतेला सामोरे जावे लागत आहे. खंडाळे (ता. भुसावळ) येथे थकीत बिलाची विचारणा करण्यासाठी गेलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला भरचौकात अश्लील शिवीगाळ केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे वीज कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आरोपीला तात्काळ बेड्या ठोकण्याची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ मार्च रोजी शिंदी महावितरण उपकेंद्रातील कर्मचारी ज्योती शिंपी या खंडाळे गावात थकीत वीज बिल वसुलीसाठी गेल्या होत्या. त्या एकट्याच आपले कर्तव्य पार पाडत असताना, गावातील संशयित आरोपी काशिनाथ बाबुसेठ याला त्यांनी बिलाबाबत विचारणा केली. याचा राग आल्याने बाबुसेठ याने सर्व लोकांसमोर शिंपी यांना अत्यंत हीन दर्जाची आणि अश्लील शिवीगाळ केली. या अनपेक्षित प्रकारामुळे महिला कर्मचारी हादरून गेल्या.

Electricity bill recovery drive
Jalgaon Crime News | भुसावळ हादरले! 'गावात कार का आणली?' म्हणत तरुणाला बेदम चोप; मदतीला गेलेल्या पोलिसाचाही शर्ट फाडला

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये पसरली. मार्च महिना असल्याने सर्वच कर्मचारी वसुलीच्या दबावाखाली असताना, महिला कर्मचाऱ्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला. तात्काळ भुसावळ ग्रामीण पोलीस स्टेशनवर कर्मचाऱ्यांनी धडक दिली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती अन् तक्रार दाखल यावेळी भुसावळ ग्रामीण उपविभागाचे अभियंता महाजन, शिंदी शाखेचे अभियंता आखरे यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. ज्योती शिंपी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्री. गायकवाड यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

Electricity bill recovery drive
Jalgaon news | प्रशासनाची महसूल वसुलीत मोठी दमछाक; सरकारी तिजोरीत 'ठणठणपाळ'!

तपास सुरू; पोलिसांची भूमिका काय?

सध्या या प्रकरणाचा पुढील तपास कॉन्स्टेबल विसपुते आणि तडवी करत आहेत. "सरकारी कामात अडथळा आणणे आणि महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग/अपमान करणे" या कलमान्वये कडक कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news