Jalgaon Mother Child Death | हृदयद्रावक : गणेशोत्सवाच्या धामधुमीत आईने चिमुकल्यासह संपवले जीवन

जळगावच्या तळेले कॉलनीतील घटनेने खळबळ
Jalgaon Mother And Child Ends Life
हेमांगिनी महाजन, शौर्य Pudhari
Published on
Updated on

Jalgaon Mother And Child Ends Life

जळगाव : देशभरात आज बाप्पाच्या आगमनाची धामधूम सुरू असतानाच जळगाव शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ५ वर्षीय चिमुकल्यासह आईने गळफास घेऊन जीवन संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील जुने जळगावच्या पुढे असलेल्या तळेले कॉलनीतील विघ्नहर्ता चौकाजवळ महाजन कुटुंबीय राहतात. निखील महाजन हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असून त्यांची सध्या नेमणूक राजस्थान येथे आहे. घराच्या तळमजल्यावर निखील महाजन हे तर भाऊ अक्षय महाजन हे पहिल्या माळ्यावर राहतात.

Jalgaon Mother And Child Ends Life
Jalgaon Crime | ४० दिवसांनंतर LCB कडून गुन्ह्याचा छडा, दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीचा खून; भाचा अटकेत

सोमवारी दुपारच्या सुमारास हेमांगिनी निखील महाजन ( वय २८ ) या मुलगा शौर्य (वय ५) याच्यासह घरात होत्या. तर उर्वरीत कुटुंबीय वरील माळ्यावर होते. सायंकाळी निखील यांच्या आई खाली आल्या असता कुणीही दरवाजा उघडत नव्हते. त्यांना शंका आल्याने त्यांनी इतरांना कळवल्यावर घडलेला प्रकार लक्षात आला.

घटनास्थळी शनिपेठ पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. महाजन कुटुंबीय संपूर्ण परिसरात परिचित आणि सर्वांशी मिळून मिसळून राहत असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news