Chain Snatching Jalgaon | मॉर्निंग वॉकदरम्यान वृद्धेचे दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावले; दुचाकीवरील दोघे भुसावळ महामार्गाच्या दिशेने पसार

सोन्याचे मनी मंगळसूत्र झडप घालून हिसकावले
 Jalgaon Elderly Woman Robbed
Jalgaon Elderly Woman RobbedPudhari
Published on
Updated on

Jalgaon Elderly Woman Robbed

जळगाव : शहरातील आयोध्या नगर परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ७५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना रविवारी (दि. १४) सकाळी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगला शांताराम चौधरी (वय ७५, रा. आयोध्या नगर, जळगाव) या रविवारी सकाळी सुमारे ६ वाजता नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. आयोध्या किराणा समोरील गल्लीतून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी त्यांना अडवले. दुचाकी चालवणाऱ्या युवकाने ‘तृप्ती कॉर्नर कुठे आहे?’ अशी विचारणा केली.

 Jalgaon Elderly Woman Robbed
Jalgaon crime news | जळगावात 'विमल'चा बंपर स्टॉक जप्त; एमआयडीसी पोलिसांची डिझो पेट्रोल पंपाजवळ धडक कारवाई

चौधरी यांनी रस्ता दाखवण्यासाठी हात केला असता, मागे बसलेल्या युवकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र झडप घालून हिसकावले.घटनेनंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरून भरधाव वेगाने भुसावळ महामार्गाच्या दिशेने पसार झाले. चोरीस गेलेल्या मंगळसूत्राची किंमत अंदाजे १ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी मंगला चौधरी यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी एकाची ओळख सादिक शेख उर्फ शेख इराणी (वय २३, रा. पापा नगर, रजा टॉवरजवळ, भुसावळ) अशी पटली असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

 Jalgaon Elderly Woman Robbed
Jalgaon crime news | ११ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार अन् हत्या प्रकरणी नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत असून वृत्त लिहिपर्यंत कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news