MLA Amol Patil Protest | आमदार अमोल पाटलांचा एरंडोल पोलीस ठाण्यात ४ तास ठिय्या: अखेर खंडणीखोर अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी उकळल्या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी किशोर बाविस्कर अडचणीत
Jalgaon MLA Amol Patil Protest  in Erandol Police Station
Jalgaon MLA Amol Patil Protest in Erandol Police StationPudhari
Published on
Updated on

Jalgaon MLA Amol Patil Protest in Erandol Police Station

जळगाव : सामान्य नागरिकांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाई होणार, असा इशारा पारोळा मतदारसंघाचे शिवसेना आमदार अमोल पाटील यांनी दिला आहे. चहा विक्रेत्याकडून १० हजार रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकरणात अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्याविरुद्ध अखेर एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल येथील मढीजवळ चहा विक्री करणारे गजानन माधवराव महाजन यांच्या दुकानावर दोन दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी किशोर हिम्मतराव बाविस्कर हे चार साथीदारांसह आले होते. दुकानात कोणताही प्रतिबंधित तंबाखू किंवा गुटखा आढळला नसतानाही “तुझ्यावर गुटख्याचा गुन्हा दाखल करतो” अशी धमकी देत त्यांनी १० हजार रुपयांची मागणी केली. भीतीपोटी महाजन यांनी ही रक्कम दिल्याचे सांगितले जाते.

Jalgaon MLA Amol Patil Protest  in Erandol Police Station
Jalgaon news: एकच मिशन, जुनी पेन्शन.., जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले; सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

दरम्यान, याच अधिकाऱ्याने एरंडोल परिसरातील इतर छोट्या व्यावसायिकांकडूनही धाडीच्या नावाखाली सुमारे २० हजार रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब आमदार अमोल पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने कारवाईचा पवित्रा घेतला.

मंगळवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता आमदार पाटील कार्यकर्त्यांसह एरंडोल पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. मात्र, सुरुवातीला पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत पाटील यांनी पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवरच ठिय्या आंदोलन सुरू केले. “जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हलणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.

Jalgaon MLA Amol Patil Protest  in Erandol Police Station
Jalgaon News: चोपड्यात भररस्त्यात 'करेक्ट कार्यक्रम'; जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात खळबळ!

या दरम्यान मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाल्याने पोलीस ठाण्याचा परिसर तणावपूर्ण झाला. अखेर पोलिसांना नमते घ्यावे लागले आणि रात्री उशिरा किशोर बाविस्कर व त्यांच्या चार साथीदारांविरुद्ध खंडणी उकळल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला.

या प्रकरणी गजानन महाजन यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार करत आहेत. या कारवाईमुळे परिसरातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, आमदार पाटील यांच्या आक्रमक भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news