Beed Crime : केज हादरले! सावत्र बापाचा १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

नात्याला काळीमा फासणारी घटना; नराधमावर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल
Child sexual abuse
सावत्र बापाचा १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
Published on
Updated on

केज : केजमध्ये नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच सावत्र बापाने लैंगिक अत्याचार केला असून, या नराधमावर केज पोलीस ठाण्यात 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने पतीसोबत मतभेद झाल्याने नऊ वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तिने आरोपीसोबत दुसरे लग्न केले. या दुसऱ्या लग्नापासून त्यांना एक मुलगाही आहे. ९ एप्रिल रोजी पीडित मुलीची आई माहेरी गेली होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास सावत्र पिता घरी आला आणि मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून त्याने गैरफायदा घेण्याचे ठरवले. त्याने आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलाला मोबाईल देऊन गुंतवून ठेवले आणि अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद चाळे करण्यास सुरुवात केली. मुलीने त्याला विरोध करत आईला सांगण्याची धमकी दिली. मात्र, आईला सांगायचे नसते, आपल्यात भांडणे होतील, असे म्हणत त्याने मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. आई घरी आल्यानंतर मुलगी रडत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. आईने विचारले असता सुरुवातीला मुलगी प्रचंड घाबरलेली असल्याने काहीच बोलली नाही, मात्र आईने विश्वासात घेऊन विचारल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला.

त्यानंतर पीडितेच्या आईने केज पोलिस ठाण्यात धाव घेत नराधम पित्याविरोधात तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारीवरून नराधमावर गु. र. नं. १९८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता ६४(३)(एफ), ६५(१) आणि पोक्सो कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पिंक पथकाचे फौजदार प्रकाश शेळके करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news