

जळगाव | पुढारी ऑनलाइन डेस्क - जळगाव शहरात एमआयडीसी परिसरातील मारुती कारच्या शोरुमला मोठी आग लागल्याची घटना बुधवार (दि.8) रोजी सकाळी घडली आहे. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे कागदपत्रे आणि नवीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
जळगाव महापालिकेच्या दोन आणि अग्निशमनची एक अशा तीन बंबाकडून आग विझविण्यासाठी यशस्वी प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र आगीमुळे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झालेले आहे. तिसऱ्या मजल्यावरुन धुराचा लोट निघाल्यानंतर सुरक्षारक्षकाच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ येथील यंत्रणा आणि अग्निशमन दलाला संपर्क साधला. एमआयडीसी परिसरातील मारुती सुझुकी अरेना (Maruti Suzuki ARENA (Manraj Motors, Jalgaon, MIDC) ही तीन मजली शोरुम असून सर्वात वरचा मजल्याला ही आग लागली. या ठिकाणी नवीन वाहने आणि त्यासाठी लागणारे स्पेअर पार्ट ठेवण्यात आले होते.