Jalgaon Bribery Case | २९ हजारांची लाच घेताना महावितरणचा सहाय्यक अभियंता 'लाचलुचपत'च्य़ा जाळ्यात

Jalgaon Crime News | पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
 bribery case
प्रातिनिधिक छायाचित्र (File Photo)
Published on
Updated on

Mahavitaran assistant engineer caught bribe

जळगाव : सौरऊर्जा प्रकल्पांच्या रिलीज ऑर्डरसाठी २९ हजार रुपयांची लाच घेताना पाचोरा-२ उपविभागातील महावितरणचे सहाय्यक अभियंता मनोज जगन्नाथ मोरे (वय ३८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि. १२ ) त्यांच्या कार्यालयात करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे सोलर फिटिंग व्यवसायात असून, त्यांनी तीन नवीन प्रकरणांची कागदपत्रे ऑनलाईन सबमिट केली होती. या तीन प्रकरणांच्या रिलीज ऑर्डरसाठी मोरे यांनी प्रत्येकी ३,००० रुपये दराने एकूण ९,००० रुपयांची मागणी केली.

 bribery case
जळगाव : भुसावळ-खंडवा तिसरी, चौथी रेल्वे लाईनसाठी भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

याशिवाय, यापूर्वी तक्रारदारांची एकूण २८ प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून दिल्याचे कारण देत, प्रत्येकी २,५०० रुपये दराने ७०,००० रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी तक्रारदारांनी आधीच ३०,००० रुपये दिले होते. उर्वरित ४०,००० पैकी पहिल्या हप्त्याचे २०,००० रुपये आणि सध्याच्या तीन प्रकरणांसाठीचे ९,००० रुपये, अशा एकूण २९,००० रुपयांची मागणी मोरे यांनी केली होती.

तक्रारदारांनी ACB कडे तक्रार दाखल केल्यानंतर, नियोजित सापळा रचून आज मोरे यांनी स्वतः लाचेची रक्कम स्वीकारली. त्यानंतर त्यांना ACB पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर आणि चालक सुरेश पाटील यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news