जळगाव : पुढारी वृत्तसेवा
तत्कालीन पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची बदली होऊन त्या जागी नवीन पोलीस अधीक्षक एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डी यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्यासमोर शहरातील गुन्हेगारांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे आहेत.
जळगाव जिल्ह्याचे माजी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी स्थानबद्ध, हद्दपारीचा सपाटा लावलेला होता. मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांना जिल्ह्यातून बाहेर व स्थानबद्धही केले मात्र जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे प्रमाण थांबू शकले नाही तर चोऱ्या घरफोड्या यांना आळा घालण्यात त्यांना पाहिजे तसे यश मिळाले नाही. जळगाव जिल्ह्यामध्ये रजत बंदी घालण्यात आलेला गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे व त्याच मोठ्या प्रमाणात तो जिल्ह्यात येतही आहेत. नुकतीच आयजी पथकाने विमल गुटख्याचा मोठा साठा जप्त केला होता. जिल्ह्याची स्थानिक गुन्हे शाखा याबाबत माहिती मिळत नाही मात्र आईजी यांचे पथक जिल्ह्यात कारवाई करू शकते त्यांना तशा सूचना मिळू शकतात. नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांची सोलापूरच्या पोलीस आयुक्त पदावर बढती झाली. त्यांच्या जागी एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी रविवारी एम राजकुमार यांच्याकडून जळगाव जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे.