Jalgaon MLC Election | जळगावात शिंदे सेनेत धुसफूस; सुमित पाटील यांच्या संभाव्य अपक्ष उमेदवारीने वाढली महायुतीची चिंता

जळगाव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीची घोषणा होताच राजकीय वातावरण तापले
Jalgaon Vidhan Parishad
Jalgaon Vidhan Parishad Pudhari
Published on
Updated on

Jalgaon Vidhan Parishad Shiv Sena Internal Rift

जळगाव : जळगाव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीची घोषणा होताच महायुतीत, विशेषतः शिवसेना (शिंदे गट) मध्ये अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. आतापर्यंत या जागेसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रताप पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती.

त्यांच्या समर्थकांकडून जिल्हाभर ‘भावी आमदार’ म्हणून बॅनरबाजीही करण्यात आली होती. मात्र आता पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

भाजपने ही जागा सोडली नाही, तर अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचा इशारा किशोर आप्पा पाटील यांनी दिल्याने महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसत आहे. तसेच जागा भाजपने सोडल्यास अंतिम निर्णय पक्षप्रमुख एकनाथ शिंदे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Jalgaon Vidhan Parishad
Jalgaon News | गाव तहानलेलं ठेवून पळवलं २० लाख लिटर 'सरकारी पाणी'! जामनेरमधील पाणी चोरीच्या 'महाघोटाळ्या'ने खळबळ!

स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत नगरपरिषद व अन्य स्थानिक संस्थांतील सदस्यांची मते निर्णायक ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर पाचोरा-भडगाव नगरपरिषदेत किशोर आप्पा पाटील गटाचे तब्बल ४७ सदस्य असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे. तुलनेत धरणगाव-नशिराबाद नगरपरिषदेत गुलाबराव पाटील गटाकडे केवळ १९ मते असल्याचे बोलले जात आहे.

नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत सुमित पाटील यांनी विरोधकांना जोरदार धक्का देत पाचोरा-भडगावमध्ये वर्चस्व सिद्ध केले होते. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यास जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Jalgaon Vidhan Parishad
Jalgaon Robbery | जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरफोड्यांत दीड लाखांहून अधिक ऐवज लंपास

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच इतर स्थानिक आघाड्यांचे मतदार भाजपला रोखण्यासाठी सुमित पाटील यांना पाठिंबा देऊ शकतात. सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले त्यांचे सलोख्याचे संबंध महायुतीच्या अधिकृत उमेदवारासाठी डोकेदुखी ठरू शकतात.

भाजपची जिल्ह्यात मजबूत संघटना असली तरी किशोर आप्पा पाटील यांच्या राजकीय रणनीतीला आव्हान देणे सोपे नसल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे. नगरपरिषद निवडणुकीदरम्यान भाजपचे नेते गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी पूर्ण ताकद लावूनही किशोर आप्पा पाटील यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळीही सुमित पाटील यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारल्यास भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.

Jalgaon Vidhan Parishad
Jalgaon Crime | बोदवड हादरले! चोरीचा संशय व्यक्त केल्याने तरुणाचा निर्घृण खून

सध्या महायुतीत जागावाटप आणि उमेदवारीवरून जोरदार हालचाली सुरू असल्या तरी अंतिम चित्र २५ तारखेनंतरच स्पष्ट होणार आहे. कोण उमेदवारी कायम ठेवणार, कोण माघार घेणार आणि कोण थेट आव्हान उभे करणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

शिंदे सेनेच्या मतांचे बलाबल

नगरपालिका मतांची संख्या

पाचोरा. २५

भडगाव. २२

धरणगाव. ९ (जनविकास आघाडी)

नशिराबाद. १०

चोपडा. १८

भुसावळ. २

वरणगाव. ६

मुक्ताईनगर. १२

एरंडोल १२

पारोळा ९

जळगाव महापालिका २५

अमळनेर. १३

सावदा. २

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news