Jalgaon Crime | बोदवड हादरले! चोरीचा संशय व्यक्त केल्याने तरुणाचा निर्घृण खून

संशयाची ठिणगी अन् रक्ताचा सडा; बोदवडमध्ये खळबळ, आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

Bodwad crime news

जळगाव : चोरीचा संशय व्यक्त केल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बोदवड शहरात घडली आहे. अन्सार पिंजारी असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण बोदवड परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेची गांभीर्य लक्षात घेता अप्पर पोलीस अधीक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत अन्सार पिंजारी आणि संशयित आरोपी अरबाज शाह हे दोन्ही तरुण एकमेकांच्या परिचयाचे होते. काही दिवसांपूर्वी अन्सार पिंजारी यांच्या घरी एक चोरीची घटना घडली होती. या चोरीमागे अरबाज शाह याचाच हात असावा, असा संशय अन्सारने व्यक्त केला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी अरबाज शाह याने अन्सारचा काटा काढण्याचे ठरवले. आज याच वादातून अरबाजने अन्सारवर जीवघेणा हल्ला चढवला, ज्यामध्ये अन्सारचा जागीच मृत्यू झाला.

Crime News
Jalgaon crime news | ११ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार अन् हत्या प्रकरणी नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप

हत्येच्या या थरारानंतर बोदवड शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित तातडीने बोदवड येथे स्पॉटवर दाखल झाले आहेत. त्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आरोपीसाठी पोलिसांची नाकाबंदी

घटनेनंतर संशयित आरोपी अरबाज शाह हा फरार झाला असून, बोदवड पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके त्याच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. "आरोपीला लवकरच बेड्या ठोकल्या जातील, पोलिसांची पथके वेगवेगळ्या मार्गांवर रवाना झाली आहेत," अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news