Jalgaon Bribe | जळगावात भूमापन अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात; १५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल
 Bribe Case
प्रातिनिधीक फोटो (File Photo)
Published on
Updated on

Land Survey Officer Arrested

जळगाव : जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले भूमापन अधिकारी जितेंद्र प्रकाश पाटील (वय ४५) यांना प्रलंबित काम करून देण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदारांच्या वडिलोपार्जित घराच्या नोंदीत झालेल्या फेरफाराविरोधात त्यांनी भूमी अभिलेख विभागाकडे अपील दाखल केले होते. संबंधित अपील मंजूर झाल्यानंतर नोंद दुरुस्त करण्याचे आदेशही देण्यात आले. मात्र, ७/१२ उताऱ्यावर आवश्यक नोंद अद्ययावत करण्याची प्रक्रिया दीर्घकाळ प्रलंबित होती.

 Bribe Case
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात वरुणराजाची 'वक्रदृष्टी'; खरीप पेरण्यांचा खोळंबा, फक्त २३ टक्केच पेरणी पूर्ण

याबाबत तक्रारदारांनी संबंधित कार्यालयात विचारणा केली असता, आरोपी जितेंद्र पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी १० हजार रुपये आणि स्वतःसाठी ५ हजार रुपये, अशी एकूण १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तक्रारदारांनी २५ जून २०२६ रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी करून लाच मागणीची खातरजमा झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. नियोजित कारवाईदरम्यान जितेंद्र पाटील यांनी तक्रारदारांकडून १५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.

 Bribe Case
Jalgaon News | सहा महिन्यांतच सिमेंट काँक्रीट रस्त्यावर खड्डे; ड्रीम कन्स्ट्रक्शनच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांनी कामकाज पाहिले असून, या प्रकरणाचा पुढील तपासही पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news