Jalgaon News | सहा महिन्यांतच सिमेंट काँक्रीट रस्त्यावर खड्डे; ड्रीम कन्स्ट्रक्शनच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

जळगाव शहरातील तरसोद फाटा ते कालिंका माता मंदिर मार्गावर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम
Poor Quality Road Work Jalgaon
Poor Quality Road Work JalgaonPudhari
Published on
Updated on

Poor Quality Road Work Jalgaon

जळगाव : जळगाव शहरातील तरसोद फाटा ते कालिंका माता मंदिर या मार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर अवघ्या सहा महिन्यांतच खड्डे पडू लागल्याने संबंधित कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत ड्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत हा रस्ता तयार करण्यात आला आहे.

एमआयडीसीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण होऊन वर्षभराचाही कालावधी उलटलेला नसताना अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत. विशेष म्हणजे, पावसाळा अद्याप पूर्णपणे सुरू झालेला नसतानाच ही अवस्था निर्माण झाल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

Poor Quality Road Work Jalgaon
Jalgaon news | अतिक्रमण विभागच बेपत्ता...! मान्सून सेलच्या बॅनरमुळे रस्ते झाले अरुंद

रस्त्यालगतच्या नाल्याच्या बाजूला उभारण्यात आलेल्या काँक्रीट कठड्यांवरील काँक्रीटदेखील काही ठिकाणी निघाल्याचे दिसून येत आहे. तसेच नाल्यावरील पुलाच्या रुंदीकरणाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसमोर अपघाताचा धोका निर्माण झाला असून, संबंधित कामाची तांत्रिक गुणवत्ता तपासून आवश्यक ती दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे. रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर त्याची नियमित पाहणी आणि गुणवत्ता तपासणी करण्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचीही तक्रार नागरिकांनी केली आहे.

Poor Quality Road Work Jalgaon
Jalgaon news | जळगावला स्वतंत्र जिल्हा रेशीम कार्यालय मंजूर

याबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे उपसंचालक साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी "फोटो पाठवा, मी पाहतो," अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, या प्रकरणावर संबंधित ठेकेदार कंपनीची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news