Jalgaon accident: जळगाव बायपासवरील खड्ड्यांनी घेतला दुसरा बळी; तरुणाचा अपघातात मृत्यू

वाढत्या वाहतुकीमुळे शहरातील विविध मार्गांवर सतत अपघात होत असून लोकांचे जीव जात आहेत
Jalgaon accident
Jalgaon accident
Published on
Updated on

जळगाव : तरसोद ते पाळधी बायपास महामार्ग नादुरूस्तीमुळे शहरातून वाहतूक वळविल्याने आज पुन्हा अपघात झाला. यात तरूणाचा बळी गेल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच अजिंठा चौफुलीजवळ भाजी विक्रेत्या महिलेचा टँकरने चिरडल्यामुळे मृत्यू झाला होता. यानंतरही जळगाव शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. गुरुवारी (दि.20) सकाळी सात वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळ झालेल्या रस्ते अपघातात अ‍ॅक्टिव्हास्वार योगेश महाजन या युवकाचा जागीच मृत्यू झाला.

Jalgaon accident
Jalgaon Car Accident | काळ आला होता; पण...! विदगावच्या तापी पात्रात कार कोसळली, ४ प्रवासी बालंबाल बचावले

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश महाजन हा इच्छदेवी चौक परिसरात राहत होता. तो ॲक्टीव्हा वाहनावरून जात असतांना अवजड वाहनाने त्याला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, त्या युवकाला सावरण्याची संधीही मिळाली नाही. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तरसोद-पाळधी बायपासच्या दुर्दशेमुळे महामार्गावरील जड वाहतूक शहरातून जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. वाढत्या वाहतुकीमुळे शहरातील विविध मार्गांवर सतत अपघात होत असून लोकांचे जीव जात आहेत.

Jalgaon accident
Jalgaon Road Accidents | जळगाव जिल्ह्यात सात महिन्यांत ३१० बळी; अपघातांची वाढती मालिका चिंताजनक

या समस्येवर नेमका कायमस्वरूपी उपाय कधी होणार, हा मोठा प्रश्न आता प्रशासनासमोर आहे. बायपास मार्गाची व्यवस्था लवकरात लवकर दुरुस्त करून वाहतूक शहराबाहेर वळवली जावी आणि अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news