जळगाव
आयएसओ मानांकन मिळवणारी जळगाव जिल्ह्यातील पहिली जामनेर पंचायत समितीPudhari News Network

Jalgaon : जामनेर पंचायत समितीला ISO मानांकन

आयएसओ मानांकन मिळवणारी जळगाव जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती
Published on

जळगाव : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ग्रामपंचायत व पंचायत समित्यांच्या सक्षमीकरण मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा म्हणून पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे ISO 9001:2015 मानांकन मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते. या प्रयत्नांतून जामनेर पंचायत समितीने ISO मानांकन प्राप्त करत जिल्ह्यातील पहिली ISO प्रमाणित पंचायत समिती होण्याचा मान पटकावला आहे.

ISO मानांकन मिळवण्यासाठी जामनेर पंचायत समितीने प्रशासनिक कार्यपद्धती, सेवा वितरण, नागरिकाभिमुखता, पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण कामकाजात उल्लेखनीय सुधारणांची अंमलबजावणी केली. गुणवत्ता व्यवस्थापन, दस्तऐवजीकरण, जनसेवा प्रक्रियांची शिस्तबद्धता, तसेच कर्मचारी प्रशिक्षण यावर विशेष भर देण्यात आला.

जळगाव
Zilla Parishad Jalgaon | दांडी बहाद्दरांवर सीईओंचे कारवाईचे आदेश

या यशाबद्दल गटविकास अधिकारी कृष्णा इंगळे यांनी ISO प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी संपूर्ण जामनेर पंचायत समितीच्या पथकाचे अभिनंदन केले आणि इतर पंचायत समित्यांनीही या उदाहरणातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. ISO मानांकन ही केवळ गुणवत्ता मान्यता नसून, ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुशासन व कार्यक्षमतेकडे वाटचाल करणारा सकारात्मक टप्पा ठरतो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news