Jalgaon Robbery | जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच दिवशी चार घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

जामनेरमध्ये दोन, बोदवड आणि धरणगावात प्रत्येकी एक घटना; धरणगावात तीन संशयितांना अटक
Chalisgaon  Jamner Theft Case
Theft CasePudhari
Published on: 
Updated on: 

Jalgaon Jamner House Burglaries

जळगाव : जिल्ह्यात चोरट्यांनी एकाच दिवशी चार ठिकाणी घरफोड्या करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी (दि. २७) जामनेर तालुक्यात दोन, तर बोदवड आणि धरणगाव येथे प्रत्येकी एक घरफोडी झाली. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, धरणगाव पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे एरंडोल आणि धुळे येथील तीन संशयितांना अटक केली.

जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथे शेतकरी वसंत मुरलीधर महाजन (६६) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २५ हजार रुपये रोख आणि सव्वाचार तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे दोन लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरला. ही घटना सकाळी पावणेसात ते पावणेबारा वाजेदरम्यान घडली. नेरी दिगर येथील आशाबाई अमरसिंग माळी (४८) यांच्या घरातूनही चोरट्यांनी ६० हजारांचे सोने, २५ हजारांची चांदी आणि ३५ हजारांची रोकड, असा एक लाख २० हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

Chalisgaon  Jamner Theft Case
Jalgaon District Bank Election : अर्ज विक्री ५०० पार; विद्यमान अध्यक्षांसह प्रमुख इच्छुकांचे उमेदवारी अर्ज दाखल

बोदवड शहरातील दत्त कॉलनीत सागर सुभाष हिवराळे (३४) यांच्या घराच्या मागील दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने आणि ३५ हजारांची रोकड असा ६८ हजारांचा ऐवज चोरून नेला.

धरणगावच्या हेडगेवार नगरातील आकाश बाळू तायडे यांच्या घरातून ३३ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले. या प्रकरणी पोलिसांनी शाकीब दाउद शेख (१८), अश्पाक शेख मुस्ताक शेख (१९) आणि इम्रान शेख फिरोज शेख (१९) यांना अटक केली. उर्वरित घरफोड्यांचा तपास सुरू असून, भरदिवसा घडलेल्या या घटनांमुळे पोलिसांच्या गस्तीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.