जळगाव : साइटच्या नावाने अधिकारी, कर्मचारी फुर्र…; बांधकाम विभागातील प्रकार

जळगाव : साइटच्या नावाने अधिकारी, कर्मचारी फुर्र…; बांधकाम विभागातील प्रकार
Published on
Updated on

जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विभाग जरी असला मात्र येथील विभागातील कर्मचारी व अधिकारी साईटच्या नावाखाली फुर्ऱ झालेली दिसून येतात. कार्यालयात अधिकारी नसले तरी कार्यालयातील दिवे मात्र लखलखत असतात. जी वीज शेतकऱ्यांना 24 तास मिळत नाही तेथेच कार्यालयात अधिकारी व कर्मचारी नसताना मोठ्या प्रमाणात विजेची नासाडी मात्र होते. वरिष्ठ मात्र यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र जळगावतील सार्वजनिक बांधकाम विभागात दिसून येत आहे.

जळगाव जिल्ह्यात शासकीय बिल्डिंग या काही हेरिटेज दर्जामध्ये गणल्या जातात या तर सार्वजनिक बांधकाम विभाग ही आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाचे दगडी इमारतीत कार्यालय आहे. याच इमारतीच्या मागे नवीन बिल्डींग बांधून दुसऱ्या दर्जाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालय निर्माण करण्यात आलेले आहे.

सार्वजनिक विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांची संख्या व त्या प्रमाणात अधिकारी व कर्मचारी साईट च्या नावाखाली फुर् झालेले दिसतात. असाच काही प्रकार सार्वजनिक बांधकाम (कन्स्ट्रक्शन विभाग ) यांच्या कार्यालयात दुपारी साडेतीन वाजता कार्यालयात लाईट सुरू होते कर्मचारी अनुपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कन्स्ट्रक्शन विभागातील कार्यालयात फक्त आणि फक्त लाईट सुरु होते. कार्यालयात किंवा टेबलावर अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते. दिवे त्या टेबलांची शोभा वाढवत होते. सार्वजनिक बांधकाम विभागातील इतर कर्मचारी व अधिकारी केव्हा जातात केव्हा येतात हे कोणालाच माहिती होत नाही. अधिकाऱ्यांना विचारले असतात त्यांच्या कार्यालयात विचारा असे उत्तर दिले. शेतकऱ्यांना शेतीसाठी लोड शेडिंग करून वीजपुरवठा करण्यात येतो मात्र सरकारी कार्यालयात कर्मचारी नसताना मोठ्या प्रमाणात लाईट जाळण्यात येतात याला जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित होतो.

एकीकडे सरकार वीज वाचवा चा नागरिकांना संदेश देत असताना सार्वजनिक विभागात कर्मचारी नसताना त्यांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात लाईट सुरु होते. तेथील एक कर्मचारी दिसला असता त्याला विचारलं असतं की अधिकारी व कर्मचारी कुठे गेले तर त्याने स्पष्ट सांगितले की सर्व साईटवर गेले इंजिनीयर साइटवर गेले ते समजते क्लॅरिकल व इतर कर्मचारी साइटवर का गेले कशासाठी गेले हा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे यांच्याशी संपर्क साधला सर त्यांनी सांगितले की त्यांच्या कार्यालयात विचारा मी कस काय सांगू शकेल असे उत्तर देऊन त्यांनी आपल्यावरील जबाबदारी झटकली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news