

Silver 4000 Rise
जळगाव : सोन्या-चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला असतानाच जळगावच्या सुवर्णनगरीत गुरुवारी (दि. २९) सकाळी अवघ्या अर्ध्या तासात पुन्हा दरांचा स्फोट झाला आहे. सकाळी ११:३० ला जाहीर झालेले दर आणि दुपारी १२:०५ ला आलेले 'अपडेटेड' दर यात मोठी तफावत दिसून आली आहे. अवघ्या ३५ मिनिटांत चांदीने ४,००० रुपयांची तर सोन्याने १,२०० रुपयांची उसळी घेतल्याने सराफा बाजारात एकच खळबळ उडाली आहे.
सकाळी ११:३० वाजता २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ७६ हजार ५०० रुपये होता, जो ग्राहकांना धक्का देणाराच होता. मात्र, हा धक्का पचवतो न पचवतो तोच दुपारी १२:०५ वाजता हा दर १ लाख ७७ हजार ७०० रुपयांवर पोहोचला. म्हणजेच अर्ध्या तासात तोळ्यामागे १,२०० रुपये वाढले.
सर्वात मोठा धक्का चांदीने दिला आहे. सकाळी ३ लाख ८८ हजारांवर असलेली चांदी अर्ध्या तासात थेट ३ लाख ९२ हजारांवर पोहोचली. अवघ्या काही मिनिटांत एका किलोमागे ४,००० रुपये वाढल्याने व्यापाऱ्यांचे आणि ग्राहकांचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
३५ मिनिटांतील वाढ
२४ कॅरेट सोने
१,७६,५०० २९ जानेवारी (सकाळी ११:३० वा.)
१,७७,७०० २९ जानेवारी (दुपारी १२:०५ वा.)
+ रु. १,२००/-
२२ कॅरेट सोने
रु. १,६१,६७०२९ जानेवारी (सकाळी ११:३० वा.)
१,६२,७७०२९ जानेवारी (दुपारी १२:०५ वा.)
+ रु. १,१००/-
३,८८,००० २९ जानेवारी (सकाळी ११:३० वा.)
३,९२,००० २९ जानेवारी (दुपारी १२:०५ वा.)
+ रु. ४,०००/-