

कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि वाढत्या मागणीमुळे मौल्यवान धातूंच्या किमतींनी आतापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. पाच दिवसांपूर्वी (23 जानेवारी) 1 लाख 60 हजार रुपयांवर असलेले सोने आता 5 हजार रुपयांच्या वाढीसह 1 लाख 65 हजार रुपयांवर पोहोचले आहे.
चांदीच्या दरात तर प्रचंड वाढ होत असून मागील आठवड्यात शुक्रवार (दि.23) 3 लाख 36 हजार रुपयांवर असलेली चांदी आता थेट 3 लाख 70 हजार रुपये प्रति किलोवर गेली आहे. गेल्या पाच दिवसांत चांदीत तब्बल 34 हजार रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे. लग्नसराईच्या ऐन हंगामात दररोज हजारो रुपयांची वाढ होत असल्याने ग्राहकांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.