

जळगाव : जळगाव आणि सावदा सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दराने सोमवारी (दि.०२) मोठी गोती खाल्ली आहे. शनिवारच्या तुलनेत आज बाजार उघडताच सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे सुमारे १० हजार रुपयांची, तर चांदीमध्ये तब्बल ५३ हजार रुपयांची ऐतिहासिक घसरण नोंदवण्यात आली आहे.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या मोठ्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले असले, तरी लग्नसराईच्या खरेदीसाठी ग्राहकांसाठी ही मोठी 'गोल्डन' संधी ठरली आहे.
शनिवारी (३१ जानेवारी) बंद झालेला बाजार आज सोमवारी (२ फेब्रुवारी) जेव्हा उघडला, तेव्हा दरांमध्ये मोठी दरी पाहायला मिळाली. रविवारच्या सुट्टीनंतर आज बाजार उघडताच दरांचे आकडे खालीलप्रमाणे स्थिरावले:
31 जानेवारी : १,५८,८०० रुपये
2 फेब्रुवारी : १,४९,००० रुपये
९,८०० रुपये
31 जानेवारी : १,४५,४६० रुपये
2 फेब्रुवारी : १,३६,४८० रुपये.
८,९८० रुपये
31 जानेवारी : ३,०३,००० रुपये.
2 फेब्रुवारी : २,५०,००० रुपये
५३,००० रुपये
आज सकाळपासूनच ग्राहकांची लगबग पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव गगनाला भिडल्याने सामान्य ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली होती. मात्र, अवघ्या दोन दिवसांत सोने १० हजारांनी आणि चांदी ५३ हजारांनी स्वस्त झाल्याने बुकिंगसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे.
डॉलरचा प्रभाव की 'मंदी'चे संकेत?
जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि डॉलरच्या मूल्यात होणारे बदल यामुळे ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शनिवारी सोन्याने १ लाख ६० हजारांचा टप्पा ओलांडलेला असताना आज थेट १ लाख ४९ हजारांवर सोने आले आहे.