जळगाव : चोपडा येथील मालापूर शिवारात गांजाची शेती

४५ लाखाचा गाजा जप्त; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई
Jalgaon ganja cultivation
गांजाची शेती
Published on
Updated on

जळगाव : चोपडा येथील मालापूर शिवारातील शेतात गांजाची लागवड करण्यात आली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून ७५० किलोग्रॅमचा गांजा रुपये ४५ लाखांचा गांजा जप्त केला. दरम्यान, संशयित आरोपी फरार झाला असून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalgaon ganja cultivation
जळगाव : घरात अवैध्यरित्या गॅस भरून देणाऱ्या संशयितावर कारवाई

मालापूर शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली असल्याची गुप्त माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार रविवारी (दि.६) चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी पथकासह या ठिकाणी छापा टाकला. यादरम्यान शेतात ७५० किलोग्रॅमचा ओला गांजा मिळून आला. हा गांजा पोलिसांनी जप्त केला असून त्याची किंमत जवळपास ४५ लाख रुपये आहे. संशयित आरोपी रुमल्या चेचऱ्या पावरा (रा. डॅडीया पाडा ह. मु. चोपडा) यांच्या शेतात गांजाची शेती आढळून असून पोलिसांची कुणकुण लागताच हा संशयित आरोपी फरार झाला. याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल चेतन सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Jalgaon ganja cultivation
Nanded News | मनाठा येथील 'सीएससी' चालकावर कडक कारवाई करा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news