Jalgaon Fraud News | बनावट सोने देऊन पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चौघांना अटक

file photo
file photo

जळगाव पुढारी वृत्तसेवा –  शहरातील गोल्डवर लोन देणारी मनप्पुरम फायनान्स लीमीटेड या संस्थेत बनावट सोने तारण ठेऊन पैसे उकळणाऱ्या टोळीचा जळगाव शहर पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी चार जणांना पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातली मनप्पुरम फायनान्स लिमीटेड नवीपेठ परिसरातील कुकरेजा कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय या खाजगी संस्थेत व्यवस्थापक म्हणुन हर्षल रविंद्र पेटकर, (वय २३ रा. नवीपेठ, जळगाव) काम पाहतात. सोने तारण ठेवून कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते. या मनप्पुरम फायनान्स लिमीटेड मध्ये १ जून रोजी बँकेत सायंकाळी जोराराम रानुराम बिस्नोई, खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा यांनी बनावट, खोटे सोन्याचा मुलामा चढवलेले दागिने खरे भासवून गहाण ठेवून त्याबदल्यात कर्ज रुपी २ लाख ६६ हजार रुपये स्वतःच्या फायद्याकरीता लबाडीने मिळविले होते.

अन् मग असा रचला सापळा

५ जून रोजी त्या प्रकारचे दागिने घेऊन दोन इसम आल्याने ते पाहून व्यवस्थापक चक्रावले. तपासणी केली असता ते सोने बनावट असल्याचे त्यांचा लक्षात आले. त्यामुळे त्यांनी अगोदर सोने ठेवलेल्या दोघांना ज्यादा ४० हजार देण्याचे आमीष देत बोलावून घेतले. ६ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जोराराम रानुराम बिस्नोई, खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा वर्षे हे वाढीव रक्कम घेण्यासाठी आले होते. बँकेचे सहकारी आणि व्यवस्थापक यांनी दोघांना कार्यालयात थांबवले आणि शहर पोलिसांना बोलावले. शहर पोलिसांनी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. अधिक चौकशी करता एका लॉजमध्ये थांबलेले सतिषचंद शोवरन सिंग (वय-३२) आणि संतोष मुन्नालाल कुशवाह (वय-३५) दोन्ही रा. आग्रा, उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेतले.

पोलिसांत गुन्हा दाखल

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात जोराराम रानुराम बिस्नोई (वय-५०) रा. दोडासर ता.जि.फलौदी, राजस्थान ह.मु. नशिराबाद ता. जि. जळगाव, सोन्याचा कारागीर खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा, (वय-३१) रा. आग्रा, उत्तर प्रदेश ह.मु. बालाजीपेठ जळगाव, सतिषचंद शोवरन सिंग, (वय-३२) आणि संतोष मुन्नालाल कुशवाह (वय-३५) दोन्ही रा. आग्रा, उत्तरप्रदेश शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार रविद्र सोनार करीत आहे.संशयित आरोपी हे आग्रा आणि जळगावातील असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news