

जळगाव : जळगाव महापालिकेचे माजी नगरसेवक आणि ठाकरे गटाचे नेते अनंत उर्फ बंटी जोशी यांनी आज दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे जळगावच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.
बंटी जोशी हे जळगाव महापालिकेतील ओळखले जाणारे आणि हसमुख स्वभावाचे नेते होते. त्यांनी नाट्य क्षेत्रातही आपला ठसा उमठवला होता. ठाकरे गटाचे नगरसेवक म्हणून त्यांनी राजकारणात आपली वेगळी छाप पाडली होती
त्यांचा मृतदेह जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या या टोकाच्या निर्णयामागील कारणांचा शोध पोलीस घेत आहेत. बंटी जोशी यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या सहकाऱ्यांसह नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे जळगावच्या राजकारणात खळबळ उडाली असून, नेमकी कुठली अडचण किंवा कारण त्यांच्या आत्महत्येमागे आहे, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. त्यांच्या निधनाने जळगावच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.