

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यामध्ये 2023 मध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. झालेल्या अतिवृष्टी व गारपीटमुळे जिल्ह्यातील 83,181 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात फक्त चाळीसगाव तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर झाल्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील 84, 471 शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्तीचा लाभ मिळाला आहे. त्यातील काहींचे इ केवायसी बाकी असल्याने अतिवृष्टी व दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहे.
जळगाव जिल्ह्यात 2023 मध्ये वर्षभरात सात वेळा अतिवृष्टी व गारपीट झाली. त्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान झाले. मार्च 2024 मध्ये 9, 11 व 12 तारखेला आलेल्या अतिवृष्टी व गारपिटमुळे 1197.70 हेक्टर आर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. अजून या ठिकाणी पंचनामे सुरू आहे.
2023 मध्ये सात वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये मार्च 18364, एप्रिल 19046, जून 15663, जुलै 8838, सप्टेंबर 7799, नोव्हेंबर 13471 असे लाभार्थी शासनाने अनुदान मंजूर केले होते. तर चाळीसगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त घोषित झाल्यानंतर 84 471 शेतकऱ्यांना लाभार्थी करण्यात आले होते व त्यांना दुष्काळी अनुदान देण्यात आले होते.
तर यातील मार्च 14023, एप्रिल 14318, जून 11733, जुलै 1265, सप्टेंबर 2543, नोव्हेंबर 6366 प्रशासनाने चाळीसगावला दुष्काळग्रस्त जाहीर केल्यानंतर 27124 इतक्या लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीने गेलेले असतानाही ऑनलाईन अनुदानांमध्ये शेतकऱ्यांची ई केवायसी प्रलंबित असल्याने मार्च 2717 लाभार्थ्यांचे 18092852 एप्रिल 2484, लाभार्थ्यांचे 23407629, नंतर 1412 लाभार्थ्यांचे 14638186, जून जुलै 2892 लाभार्थ्यांचे 19055139, सप्टेंबर 2076 लाभार्थ्यांचे 17203553, नोव्हेंबर 5195 , लाभार्थ्यांचे. 27110579 व प्रशासनाने चाळीसगावला दुष्काळग्रस्त जाहीर केल्यानंतर 18563 इतक्या लाभार्थ्यांचे 313484765 इतकी अनुदानाची रक्कम शासन तिजोरीत पडून आहेत.
2024 च्या मार्च महिन्यात आलेल्या तीन दिवसांच्या पाऊस व गारपीट मुळे जिल्ह्यातील जवळपास पाच ते सहा तालुक्यांमधील 11 91.70 हेक्टर आर इतक्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजूनही प्रशासनाकडून येथे पंचनामे करण्यात येत आहेत .
हेही वाचा –