Jalgaon Excise Raid | हातभट्ट्यांवर धडक कारवाई: पाच महिन्यांत ९७६ गुन्हे; सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त, ७९४ जणांना अटक

अवैध दारू निर्मिती आणि विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम सुरू
Excise Action Illegal Liquor
Excise Action Illegal LiquorAI Photo
Published on
Updated on

Jalgaon Excise Action Illegal Liquor

जळगाव : जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती आणि विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत विभागाने जिल्हाभरात तब्बल ९७६ गुन्हे दाखल करून ७९४ आरोपींना अटक केली. या कारवाईत २ कोटी २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

उत्पादन शुल्क विभागाने विशेषतः गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यांवर लक्ष केंद्रित केले. या कालावधीत हातभट्टी दारूशी संबंधित ७५१ कारवाया करण्यात आल्या. यामध्ये ५६३ आरोपींना अटक करण्यात आली. कारवाईदरम्यान सुमारे १ कोटी ९९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.

Excise Action Illegal Liquor
Jalgaon News : न्हाईच्या ठेकेदाराचे कामाकडे दुर्लक्ष का? अधिकारी-ठेकेदाराच्या ‘साटेलोट्या’चा संशय; तरसोदजवळ जीवघेणे खड्डे

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये तसेच छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध दारू निर्मितीच्या ठिकाणांवर विभागाकडून कारवाई केली जात आहे.

दरम्यान, गावठी हातभट्ट्यांवरील कारवाईनंतर आता पॉलिथिनच्या पिशव्यांमधून विकल्या जाणाऱ्या ‘पावच’ दारूच्या विक्रेत्यांवरही विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. बनावट अथवा अवैध पद्धतीने तयार केलेली दारू विक्री करणाऱ्यांविरोधात लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे संकेत विभागाने दिले आहेत.

उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, आगामी काळात ही मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Excise Action Illegal Liquor
Noise Pollution Jalgaon | कर्कश डीजेचा दणदणाट भोवला; चोपड्यात ‘मोहिनी डीजे बँड’ मालकाविरोधात गुन्हा

जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. गावठी हातभट्ट्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या आहेत. आता छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या ‘पावच’ दारूच्या विक्रीवरही करडी नजर ठेवण्यात येत आहे. अशा विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई करून कडक कायदेशीर पावले उचलली जातील.

- प्रदीप पोटे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news