जळगाव : असाक्षरांची परीक्षा १७ मार्चला, ट्रान्सजेंडर देखील परीक्षेला प्रविष्ट

जळगाव : असाक्षरांची परीक्षा १७ मार्चला, ट्रान्सजेंडर देखील परीक्षेला प्रविष्ट

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील सत्तानगरमध्ये ६०८ असाक्षर मिळाले असून केंद्र पुरस्कृत "नव भारत साक्षरता कार्यक्रम" या उपक्रमाव्दारे अशा असाक्षर व्यक्तींची परीक्षा १७ मार्चला आयोजित करण्यात आली आहे. त्यामधून असाक्षरांपैकी किती साक्षर झाले हे समोर येणार आहे.

जिल्हयातील एकूण ५७,६०८ नवसाक्षर परीक्षेला प्रविष्ट होत आहेत. त्यापैकी स्त्रियांची संख्या ही ४१,२५३ पुरुष संख्या १६३४९ व ६ ट्रान्सजेंडर परीक्षेला प्रविष्ट होत आहेत.

जिल्हयातील असाक्षर व्यक्तींची ही परीक्षा रविवार, दि. १७ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असाक्षरांची नोंदणी ज्या नजीकच्या शाळेवर झालेली आहे. त्या ठिकाणी जावून त्यांनी परीक्षा दयावयाची आहे. हा कार्यक्रमात केंद्रसरकार पुरस्कृत असून, यात मोठया संख्येने सर्व नव साक्षर व्यक्तीने उपस्थित राहून, परीक्षा देण्याचे आवाहन, शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परीषद कल्पना चव्हाण यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news