

जळगाव : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वरणगाव पाचोरा भुसावळ अमळनेर सावदा यावल या ठिकाणी 12 जागांसाठी 20 रोजी मतदान होणार आहे. बुधवारी (दि. 10) माघारीच्या दिवशी भुसावळ येथील 5 ब मधील उमेदवाराने माघार घेतल्यामुळे भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. यापूर्वी भाजपाचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराने सलग दुसऱ्यांदा माघार घेतलेली आहे.
जळगाव जिल्ह्यातील वरणगाव या ठिकाणी 10 अ व 10 क, पाचोरा 11अ व 12ब, भुसावळ 4 ब 5 ब, 11ब, अमळनेर 1 अ, सावदा 2 ब, 4 ब, 10 ब, यावल 8 ब या 12 ठिकाणी 20 रोजी मतदान होणार आहे. 21 रोजी मतमोजणी होणार आहे.
बुधवारी माघारीच्या दिवशी भुसावळ येथील 5 ब मधील भाजपाचे उमेदवार परीक्षित बऱ्हाटे यांच्या विरुद्ध उभे असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अशोक पितांबर चौधरी यांनी माघार घेतल्यामुळे परीक्षित बऱ्हाटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा 21 तारखेला करण्यात येणार आहे. यापूर्वी अशोक पितांबर चौधरी यांनी प्रभाग क्रमांक 21 मधूनही माघार घेतली होती. ते माजी आमदार संतोष चौधरी व अनिल चौधरी यांचे अत्यंत निकटवर्गीय कार्यकर्ते आहे.
आता यासंदर्भात पुढे केवळ भुसावळ येथील प्रभाग क्रमांक 4 'ब' आणि 11 'ब' या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
यापूर्वी भुसावळ येथील प्रभाग क्रमांक 8 मधून मुकेश पाटील, प्रभाग क्रमांक 21 मधून निर्मल उर्फ पिंटू कोठारी तसेच प्रभाग क्रमांक 23 'अ' मधून महिमा अजय नागराणी यांची त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार शिल्लक नसल्याने बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.