Jalgaon Drought | शिरसाळ्यात बंधाऱ्याचा सांडवा फोडून गौण खनिज उत्खनन; जलसंधारणाच्या उपाययोजनांवरच प्रश्नचिन्ह

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे जलसंधारणासाठी निर्देश; जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना कारवाईचे आदेश, सिंचन विभागाकडून पंचनामा व एफआयआरसाठी पत्र
Minor Mineral Excavation Jalgaon
जेसीबीच्या साहाय्याने बंधाऱ्याचा सांडवा फोडून हजारो ब्रास गौण खनिजाची वाहतूक Pudhari
Published on: 
Updated on: 

Minor Mineral Excavation Jalgaon

जळगाव : जिल्ह्यात संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पाणीपुरवठा, जलसंधारण, चारा उपलब्धता आणि रोजगाराच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. मात्र, दुसरीकडे बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे गौण खनिज उत्खननासाठी जेसीबीच्या साहाय्याने बंधाऱ्याचा सांडवा फोडून हजारो ब्रास गौण खनिजाची वाहतूक केल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे जलसंधारणाच्या उपाययोजनांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दुष्काळ निवारणाच्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी बंधाऱ्यांची दुरुस्ती, गाव तलाव व पाझर तलावांतील गाळ काढणे, नाल्यांचे खोलीकरण, वनराई बंधारे उभारणे आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई टाळण्यासाठी उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करण्यावरही त्यांनी भर दिला.

Minor Mineral Excavation Jalgaon
Jalgaon Burglary | जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट; अडीच लाखांचा ऐवज लंपास

मात्र, शिरसाळा येथील बंधाऱ्याचा सांडवा फोडून गौण खनिजाची वाहतूक झाल्याचा आरोप होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. बंधाऱ्याचे नुकसान झाल्यास त्याचा परिणाम पाणीसाठा आणि जलसंधारणावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचे आदेश

शिरसाळा येथील कथित प्रकाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना संबंधित व्हिडिओ दाखविण्यात आले. यावेळी त्यांनी संबंधित तहसीलदारांना या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.

सिंचन विभागाकडून पंचनामा व एफआयआरसाठी पत्र

या प्रकरणाबाबत सिंचन विभागाचे श्री. कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता, मुक्ताईनगर येथील सिंचन विभागाचे संबंधित कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी ग्रामपंचायतीने पंचनामा करून एफआयआर दाखल करावा, यासाठी पत्र दिल्याची माहिती त्यांनी दिली.

Minor Mineral Excavation Jalgaon
Jalgaon Peon Death Case | खासगी फायनान्स अन् सावकारीच्या जाचातून शिपायाने संपवले जीवन?

चौकशी आणि कारवाईकडे लक्ष

शिरसाळा येथील बंधाऱ्याच्या सांडव्याचे नेमके किती नुकसान झाले, गौण खनिजाची वाहतूक किती प्रमाणात झाली आणि त्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, याची सविस्तर चौकशी होणे आवश्यक आहे. महसूल आणि सिंचन विभागाने संयुक्तपणे पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा, संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी आणि बंधाऱ्याची आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

एकीकडे दुष्काळ निवारणासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले जात असताना, दुसरीकडे बंधाऱ्याच्या सांडव्याच्या नुकसानीचा आरोप समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणात जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभाग पुढे कोणती कारवाई करतात, याकडे शिरसाळ्यासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news