Jalgaon Municipal Election | जळगाव नगरपालिका निवडणूक : मतदान केंद्र असलेल्या शाळांना शुक्रवारी, शनिवारी सुटी जाहीर
Jalgaon district municipal election
जळगाव : राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नगर परिषद नगर पंचायत सुधारीत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार जळगाव जिल्हयातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव, पाचोरा या 6 नगर परिषद मधील 09 प्रभागांमध्ये 20 डिसेंबर रोजी मतदान तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हयातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव, पाचोरा या नगर परिषदा, नगर पंचायतीच्या हद्दीतील ज्या प्रभागांमध्ये मतदान आहे. त्या प्रभागातील मतदान केंद्र असणाऱ्या शाळांना 19 आणि 20 डिसेंबर 2025 रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच 19 डिसेंबर 2025 रोजी संबंधित मतदान अधिकारी , कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहचणार आहेत. त्यामुळे ही सुटी देण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
ही सुटी राज्य निवडणूक आयोगाच्या उपसचिव यांच्या आदेशान्वये देण्यात आली आहे. जिल्ह्यातील संबंधित शाळांच्या सुट्यांची नोंद पालक व विद्यार्थी यांनी घ्यावी, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

