Jalgaon News | जळगावात ‘वॉश आऊट कॉम्बिंग ऑपरेशन'मध्ये ८४ गुन्हेगार गजाआड

गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस दलाची मोठी मोहीम
image of criminal in Jalgaon
Jalgaon Crime news pudhari photo
Published on
Updated on

84 criminals caught by police in jalgaon

जळगाव - जळगाव जिल्हा पोलीस दलाने ९ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत शहरात ‘वॉश आऊट’ या शोध मोहिमेअंतर्गत मोठे कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. या धडक कारवाईत ८४ हून अधिक विविध गंभीर गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे.

जळगाव शहर, जिल्हापेठ, एमआयडीसी, जळगाव तालुका आणि रामानंद नगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संवेदनशील भागांना लक्ष्य करून ही मोहीम राबवण्यात आली. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये एकच खळबळ उडाली. या मोहिमेत अटकेत असलेल्यांमध्ये हद्दपार केलेले, इतर गुन्ह्यांमधील फरार असलेले, रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार, चोरटे आणि दारू विक्रेते यांचा समावेश असून हे सर्व गंभीर गुन्हेगार संबंधित पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवर होते. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले आहे, त्यांच्यावर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. विशेषतः विनापरवानगी हद्दपार असताना शहरात पुन्हा दाखल झालेल्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

image of criminal in Jalgaon
SRPF Office Inauguration: जळगावात एसआरपीएफ कार्यालयाचे गुप्त पध्दतीने उद्घाटन

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी या कारवाईचे नियोजन केले.

या कारवाईत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी, शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, एमआयडीसीचे बबन आव्हाड, जिल्हापेठचे प्रदीप ठाकूर, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे आणि रामानंदनगरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्यासह प्रत्येक पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस पथकांनी सक्रिय सहभाग घेतला.

image of criminal in Jalgaon
Jalgaon Crime : जलजीवन मिशनमध्ये देयक मिळविण्यासाठी लाच प्रकरणी सरपंचासह दोघांना अटक

जिल्हा पोलीस दलाने शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारची मोहीम राबवून गुन्हेगारांना जरब बसवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news