Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलगी घरात एकटी पाहून अतिप्रसंग करणाऱ्याला सश्रम कारावास

File Photo
File Photo

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – घरामध्ये अल्पवयीन मुलगी एकटी असल्याची संधी साधून तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या चोपडा तालुक्यातील गोरगावले येथील आरोपीस अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने पंधरा वर्षाचा सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, घरामध्ये असणाऱ्या आई-वडील व आजोबा हे शेतात तूर कापण्यासाठी गेले असताना मुलगी घरात एकटी असताना ही संधी साधून चोपडा तालुक्यातील गोरगावले खुर्द येथील धीरज रवींद्र फुगारे (वय २०) याने ६ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरात प्रवेश करून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करत मारहाण देखील केली. त्यामुळे ती जखमी झाली आहे. सायंकाळी मुलीचे आई वडील घरी आले असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. तिला उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातच पोलिसांना दिलेल्या जबाबावरून आरोपी धीरज फुगारे विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी तपास केला. हा खटला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील ॲड. शशिकांत पाटील यांनी यात ११ साक्षीदार तपासले. पीडिता, तिची आई, डॉ. गुरुप्रसाद, डॉ. पंकज पाटील, डॉ. पवन पाटील यांची साक्ष ग्राह्य धरून न्या. पी आर चौधरी यांनी आरोपी धीरज फुगारे याला दोषी ठरविले आहे. त्यानंतर न्यायालयाने आरोपीस गुन्ह्यात १५ वर्षांचा सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ वर्षे साधी शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news