Jalgaon Crime | कारमधून सुरु होती गुटखा व तंबाखूची वाहतुक, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

Jalgaon Crime | कारमधून सुरु होती गुटखा व तंबाखूची वाहतुक, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव- अमळनेर शहरातील चोपडाई रोडवरून कारमधून गुटखा, तंबाखू व पानमसाल्याची वाहतूक करणाऱ्या कारवर अमळनेर पोलीसांनी दि. २१ रोजी कारवाई केली. पोलिसांनी कारसह २ लाख ७३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील चोपडा रोडवरून कार क्रमांक एम एच १४ ई यू ५५६२ मधून बेकायदेशीरित्या गुटखा, तंबाखू व पान मसाल्याची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती अमळनेर पोलीसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी २१ एप्रिल रोजी सकाळी ११ ला चोपडा रोडवर एम एच १४ ई यू ५५६२ या कारला थाबविले. पोलीसांनी कारची तपासणी केली असता कार मध्ये गुटखा, तंबाखू व पान मसाला असे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेले तंबाखू युक्त पदार्थ कारसह २ लाख ७३ हजार रूपयांचा मुदेमाल मिळून आला.  पोलीसांनी कार सह मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात कार चालक अमोल अशोक पवार वय ४१ रा. बोराडी ता.शिरपूर जि.धुळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे ह्या करीत आहे.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news