

Weapon trafficking Jalgaon
जळगाव: मध्यप्रदेश मधील खरगोन येथील दोन व्यक्ती गावठी कट्टे विक्री करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींसह दोन गावठी कट्टे व मोटरसायकल असा 1लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिश्र वस्तीत उत्सव काळात काही समाजकंटाकडून शस्त्र संदर्भात कारवाई करा असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिले होते.
त्याअनुषंगानेअपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, यांच्या मार्गदर्शना खालील स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अमलदार यांना मार्गदर्शनपर सुचना देण्यात आलेल्या आहेत. ८ रोजी सहाय्यक फौजदार. रवी नरवाडे व पो.हे.कॉ. गोपाळ गव्हाळे यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन व्यक्ती मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील तालुका भगवानपूर ,सिरवेल, येथून अवैधरित्या गावठी कटूटे विक्री करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील रावेर तालच्या मार्गे येणार आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव कडिल पो.उप.निरी. शरद बागल, सहाफौ. रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे, पो.हे.कॉ. नितीन चाविस्कर, पो. कॉ. बबन पाटील, चा.पो.हे.कॉ. दिपक चौधरी यांचे पथक तयार करुन, रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत पाल दुरक्षेत्र येथे जंगल परिसरात सापळा रचला, मिळालेल्या माहीतीप्रमाणे पाल ता. रावेर जि जळगाव च्या जंगल परिसरात पथकातील अधिकारी व कर्मचारी सापळा लावून थांबले.
त्यावेळी , TVS RAIDER कंपनीची क्र. MP-१०-ZC-९६५० काळया रंगाची मोटार सायकलवर डोक्याला निळी पगडी बांधलेला दिसून आला . तसेच एक अंदाजे २५ वर्ष वयाचा व्यक्ती TVS SPORT कंपनीची MP-१०-MV-१४६२ काळया रंगाची मोटार सायकलवर येतांना दिसले. त्यांना फॉरेस्ट नाका पाल येथे सापळा पथकातील अंमलदार थांबवत असतांना, ते पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले त्यावेळी त्याचा पाठलाग करुन पुढे दोन्ही रस्त्यावर लावलेल्या सापळ्यात आरोपीतांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून ०२ गावठी कट्टयासह ०२ मोटार सायकली, ०२ मोबाईल हॅन्डसेट असे एकूण १लाख ,७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाला आरोपी गोविंदसिंग ठानसिंग बरनाला, वय-४५, रा. सीरवेल महादेव ता. भगवानपुरा जि. खरगोन, (म.प्र.), निसानसिंग जिवनसिंग बरनाला, वय-२३, रा.उमर्टी ता.वरला जि.बडवाणी ह.मु. रा.सीवेल महादेव ता. भगवानपुरा (म.प्र.) त्यांच्या विरुध्द रावेर पोलीस ठाणे येथे कायदेशीर कारवाई करण्यात आली असून या गुन्हयाचा तपास पो. उप. निरी. तुषार पाटील हे करीत आहेत.