Jalgaon Crime | 14 वर्षीय बालिकेवर अत्याचार

Jalgaon Crime | 14 वर्षीय बालिकेवर अत्याचार
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
चाळीसगाव शहरातील मालेगाव रस्त्यावर कामाच्या निमित्ताने एका 14 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेचा देखील सहभाग असून चाळीसगाव पोलिसात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला (रा. रेल्वे स्टेशन जवळ चाळीसगाव) रमाबाई अजय शिंदे (वय 55 वर्षे धंदा- मजुरी, रा. राखुंडे  चाळ, जुना मालेगांव रोड, चाळीसगांव)  या महिलेने 18 जानेवारी रोजी कामाला जायचे आहे असे सांगून निवांत हॉटेल, कन्नड बायपास रोड येथे असलेल्या झोपडीमध्ये फूस लावून आणले. या ठिकाणी रमाबाई शिंदे हिने आरोपी रविंद्र उर्फ बापु अर्जुनसिंग राजपुत (वय 54 वर्षे धंदा- हॉटेल व्यवसाय, रा. जुने मराठा मंगल कार्यालय जवळ, इच्छादेवी रोड, चाळीसगांव) याला झोपडीत बसविले. त्यानंतर आरोपी रवींद्र राजपूत याने केवलसिंग उर्फ संजु जयसिंग कछवा (वय 53 वर्षे धंदा- नोकरी रा. धुळे रोड, पोस्टल कॉलनी, चाळीसगांव) यास देखील बोलविले. रमाबाई शिंदे हिने झोपडीचा दरवाजा बाहेरुन लावून घेतला. आरोपी रवींद्र राजपूत व केवलसिंग कछवा यांनी अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केला. रमाबाई शिंदे हिने पिडीतेस सदरची घटना कोणास सांगु नको नाहीतर तुझी बदनामी होईल अशी धमकी दिली. मात्र पीडित बालिकेने दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलिसात तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news