Jalgaon Chalisgaon Minor Girl Assault Case |चाळीसगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांना अटक

Jalgaon | मंगळसूत्राच्या कार्यालयातील स्वच्छतागृहात नेऊन अत्याचार केल्याचा आरोप; तिसऱ्या संशयित महिलेने धमकी दिल्याची फिर्याद
Child Abuse Case
Child Abuse CasePudhari
Published on: 
Updated on: 

जळगाव - चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडवरील एका मंगल कार्यालयातील महिला स्वच्छतागृहात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ ते सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडल्याची फिर्याद पीडितेने दिली आहे. संशयित महिला पीडितेला जबरदस्तीने मंगल कार्यालयातील महिला स्वच्छतागृहात घेऊन गेली. तेथे दोन पुरुष संशयितांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या वेळी संशयित महिलेने पीडितेला विरोध करू न देता धमकावल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

घटनेनंतरही पीडितेला धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांत भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Child Abuse Case
Bhusawal Crime | दारूच्या नशेत शिवीगाळ; रुमालाने गळा आवळून मित्राचा खून

राहुल अशोक (पूर्ण नाव माहीत नाही) आणि आर्य (पूर्ण नाव माहीत नाही), दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी नमूद केले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. श्रद्धा (पूर्ण नाव माहित नाही, रा. चाळीसगाव) हीदेखील गुन्ह्यातील संशयित आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करीत आहेत.

Child Abuse Case
Gulabrao Patil | हवेतले पंचनामे नकोत; बांधावरचे वास्तव मांडा: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा अधिकाऱ्यांना थेट इशारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news