जळगाव: पिंप्री येथे दीड लाखांची घरफोडी

जळगाव: पिंप्री येथे दीड लाखांची घरफोडी

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : पारोळा तालुक्यातील पिंप्री येथे शेतकऱ्याच्या घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातून १ लाख १० हजार रुपये रोख व ३० हजार रुपयांचे सहा ग्रॅमचा कानातील दागिना अज्ञात चोरट्याने लंपास केला. या प्रकरणी पारोळा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.६) सकाळी साडेआठ ते साडेनऊ या दरम्यान संदीप लालचंद पाटील (वय 32) यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाच्या दरवाजाचे कुलूप तोडून १ लाख १० हजार रुपये रोख व सहा ग्रॅमचे सोन्याचे टोगल असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने प्रसार केला. या प्रकरणी पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमर वसावे करीत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news