Jalgaon Crime News | कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा: दांपत्यासह ३ जण ताब्यात; ३ महिलांची सुटका

Jalgaon Brothel Raid | शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
raid-on-brothel
प्रातिनिधिक छायाचित्र (File Photo)
Published on
Updated on

Jalgaon Brothel Raid

जळगाव: शहरातील खेडी परिसरातील एक कॉलेज जवळ अवैधपणे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांची सुटका केली. दोन गिऱ्हाईक आणि व्यवसाय चालविणारे दांपत्यासह ५ जणांना ताब्यात घेतले आहे. यात एका संशयित महिलेचा समावेश आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील खेडी परिसरातील एका कॉलेजजवळ एक महिलेने वेश्या व्यवसाय करण्यासाठी काही महिलांना आणले असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. याबाबत परिसरातील नागरिकांनी तक्रार देखील केली होती.

raid-on-brothel
Weather Alert Jalgaon | जळगाव जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’!

पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. सुरुवातीला डमी गिऱ्हाईक पाठवून खात्री केली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने छापा टाकला. या कारवाईत कुंटणखाना चालणाऱ्या दांपत्यासह 3 जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आणि या ठिकाणी असलेले गिऱ्हाईक म्हणून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये एकूण पाच संशयित आरोपी आहेत तर तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आले आहे.

पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, इंदल जाधव, पोलिस कॉन्स्टेबल विक्की इंगळे, अमोल वंजारी, अनिल कांबळे, निलेश घुगे, काजल सोनवणे यांनी ही कारवाई केली.

raid-on-brothel
जळगाव : हृदयद्रावक ! इयत्ता बारावी शेवटची ठरली; विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news