Jalgaon Bribery Case Seizure-लाच प्रकरणातील आरोपी अधिकाऱ्याच्या जळगावातील घरातून तब्बल २.९४ कोटींचा मुद्देमाल जप्त

Jalgaon Bribery Case Seizure-लाच प्रकरणातील आरोपी अधिकाऱ्याच्या जळगावातील घरातून तब्बल २.९४ कोटींचा मुद्देमाल जप्त
bribery
bribery Pudhari
Published on
Updated on

Assets Worth 2.94 Crore rupees Seized from Jalgaon Home of Officer Accused in Bribery Case

जळगाव : लाच स्वीकारताना रंगेहात अटक झालेले अकोला येथील सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (वर्ग-१) किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्या निवासस्थानातून तब्बल २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्या जळगावातील विष्णुनगर येथील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या घरझडतीत ही कारवाई करण्यात आलीय.

किरण चौधरी यांना तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यानंतर २६ जून रोजी अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपीचे राहते घर जळगावातील विष्णुनगर येथे असल्याने जळगाव ए सी बी पथकाला घरझडतीचे आदेश देण्यात आले. सुरुवातीला घर बंद असल्याने ते पंचांसमक्ष सीलबंद करण्यात आले होते.

bribery
Jalgaon Bribe | जळगावात भूमापन अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात; १५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

दरम्यान, २८ जून रोजी पहाटे आरोपीच्या काही नातेवाईकांनी सीलबंद घराच्या मागील गॅलरीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यावेळी एसीबी आणि स्थानिक पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर २ जुलै रोजी आरोपीची पत्नी मनिषा चौधरी यांच्या उपस्थितीत, दोन शासकीय पंच, गोल्ड व्हॅल्युअर, बँक कॅशियर आणि डॉक्टर यांच्या उपस्थितीत घरझडती घेण्यात आली. या कारवाईत रोख रक्कम : १ कोटी ५३ लाख ८४, हजार ६३० व ४२२.१०० ग्रॅम सोन्याचे दागिने ६० लाख ,५७ हजार १३५, स्थावर मालमत्तेची कागदपत्रे रुपये ६२ लाख ,१३ हजार ३७६, तर १५४.५०० ग्रॅम चांदीचे दागिने : ३१,४१६, सोने खरेदीच्या पावत्या : ११,५२,७४५, घरातील मौल्यवान वस्तू : ६,२५,५४५असा एकूण जप्त मुद्देमाल : २ कोटी ९४लाख ,६४ हजार ८४७ मुद्देमाल जप्त करण्यात आला.

bribery
Jalgaon crime : चोपड्यात LCBची धडक कारवाई; गावठी कट्टा, मॅगझिनसह, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्यासह एसीबी जळगावच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news