Jalgaon Child Marriage Case: 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह अन् प्रसूती; शाळा सोडल्याच्या दाखल्यामुळे बिंग फुटले

पतीसह सासरच्या-माहेरच्या पाच जणांवर धुळे शहरात नोंद झालेला गुन्हा बोदवड पोलिसांकडे वर्ग
Minor Girl Marriage  Case
Minor Girl Marriage Case Pudhari
Published on
Updated on

Minor Girl Marriage

जळगाव : अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देत तिचे आयुष्य धोक्यात घालणाऱ्या पतीसह सासरच्या आणि माहेरच्या पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अवघ्या १७ वर्षांच्या मुलीची प्रसूती झाल्यानंतर तिच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पती, सासू, सासरे तसेच मुलीच्या आई-वडिलांविरुद्ध बीएनएस, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पोक्सो कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील खोपरपाट येथील रहिवासी असलेल्या पीडित मुलीचा विवाह सुमारे दोन वर्षांपूर्वी तिच्या आई-वडिलांच्या संमतीने बोदवड तालुक्यातील आमदगाव येथील रोशन राजेंद्र तोरे याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर पीडिता गरोदर राहिली. प्रसूतीसाठी तिला १ ऑगस्ट २०२६ रोजी धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. तेथे तिने एका बाळाला जन्म दिला.

Minor Girl Marriage  Case
Jalgaon Crime : दहावीच्या विद्यार्थ्यावर चॉपरने जीवघेणा हल्ला; दोन दिवसांपूर्वीच्या वादातून घटना

शाळेच्या दाखल्यातून धक्कादायक सत्य उघड

रुग्णालयातील नोंदणी आणि चौकशीदरम्यान पीडितेच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तिची जन्मतारीख १० फेब्रुवारी २०१० असल्याचे समोर आले. त्यामुळे विवाहाच्या वेळी तसेच प्रसूतीच्या वेळीही ती कायद्यानुसार अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर धुळे शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक रेखा शालीग्राम सोनवणे यांनी चौकशी केली. त्यानंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या प्रकरणातील घटनास्थळ बोदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील कारवाईसाठी गुन्हा बोदवड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

Minor Girl Marriage  Case
Jalgaon News | जळगावच्या बळीराजाला दिलासा! ‘अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती’तून ३१,९०८ शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल १८४ कोटी वर्ग!

पतीसह आई-वडिलांवरही कारवाई

या प्रकरणी पती रोशन राजेंद्र तोरे, सासू निर्मलाबाई राजेंद्र तोरे, सासरे राजेंद्र धनराज तोरे (सर्व रा. आमदगाव, ता. बोदवड) तसेच पीडितेची आई चंदाबाई महादू मालचे आणि वडील महादू शिवाजी मालचे (दोघे रा. खोपरपाट, ता. अमळनेर) अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींविरुद्ध बीएनएस कलम ६४(२), बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ मधील कलम ९, १० व ११ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बोदवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शुभम जाधव करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news