Bhusawal Fraud | भुसावळ मृद व जलसंधारण विभागात ८६ लाखांच्या अपहाराचा आरोप; वरिष्ठ लिपिकाविरुद्ध गुन्हा

भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  Fraud
FraudPudhari
Published on
Updated on

Soil And Water Conservation Department

भुसावळ भुसावळ येथील मृद व जलसंधारण उपविभागात शासकीय वेतन प्रणालीत कथित फेरफार करून तब्बल ८६ लाख ८ हजार ६४३ रुपयांचा अपहार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विभागातील वरिष्ठ लिपिक तनुज रवींद्र सैंदाणे (रा. पवन हिल्स, जळगाव) यांच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन व पूरक देयके तयार करणे तसेच कोषागाराशी संबंधित कामकाजाची जबाबदारी होती. या अधिकाराचा गैरवापर करून फेब्रुवारी २०२१ ते मार्च २०२६ या कालावधीत 'सेवार्थ' प्रणालीमध्ये स्वतःच्या मूळ वेतनात आणि विविध भत्त्यांमध्ये कथितरीत्या नियमबाह्य वाढ करण्यात आली.

  Fraud
Bhusawal Railway Station | भुसावळ रेल्वे स्टेशनवर पडलेले वडे विकणारा अखेर गजाआड; स्टॉल सील, ठेकेदाराचा परवाना रद्द

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या फेरफाराच्या आधारे तयार करण्यात आलेली वेतन बिले खरी असल्याचे भासवून ती आहरण व संवितरण अधिकारी तथा उपअभियंता निनाद विवेक रत्नपारखी यांच्या स्वाक्षरीसाठी सादर करण्यात आली. त्यानंतर ही बिले भुसावळ कोषागार कार्यालयात सादर करून आरोपीने स्वतःच्या बँक खात्यात ७० लाख ३८ हजार ३७ रुपये जमा करून घेतल्याचा आरोप आहे.

याशिवाय, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) आणि डीसीपीएसमधील कपातीच्या रकमेतही कथित फेरफार करून १५ लाख ७० हजार ६०६ रुपये स्वतःच्या एनपीएस खात्यात जमा केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारे शासनाची एकूण ८६ लाख ८ हजार ६४३ रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  Fraud
Bhusawal Ganja Seizure | भुसावळच्या ताजनगरात ४ लाख ४० हजारांचा गांजा जप्त

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर उपअभियंता निनाद विवेक रत्नपारखी (वय ३२, रा. आदर्श नगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा २५ जून रोजी नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, सेवार्थ प्रणालीतील फेरफार आणि संबंधित कागदपत्रांची सखोल चौकशी सुरू असून, तपासानंतर या प्रकरणातील अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news