Bhusawal Railway Station | भुसावळ रेल्वे स्टेशनवर पडलेले वडे विकणारा अखेर गजाआड; स्टॉल सील, ठेकेदाराचा परवाना रद्द

व्हायरल व्हिडिओनंतर रेल्वे प्रशासनाची कारवाई; सीसीटीव्ही फुटेजवरून विक्रेत्याला ठोकल्या बेड्या
Bhusawal Railway Station Vada Seller Arrested
भुसावळ रेल्वे प्रशासनाने 'त्या' विक्रेत्याला तात्काळ अटक केलीPudhari
Published on
Updated on

Bhusawal Railway Station Vada Seller Arrested

जळगाव : भुसावळ रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर खाली पडलेले वडे पुन्हा उचलून प्रवाशांना विकणाऱ्या त्या निर्लज्ज विक्रेत्यावर अखेर रेल्वे प्रशासनाने कायद्याचा बडगा उगारला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या भुसावळ रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत 'त्या' विक्रेत्याला तात्काळ अटक केली आहे.

सीसीटीव्ही फुटेज ठरले मुख्य हत्यार; आरोपी 'आरपीएफ'च्या ताब्यात

प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या वेंडरचा शोध घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. सीसीटीव्हीच्या आधारे त्या विक्रेत्याची ओळख पटवून त्याला तात्काळ अटक करण्यात आली. पुढील कडक कायदेशीर कारवाईसाठी त्याला रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) ताब्यात देण्यात आले असून, रेल्वे कायद्याच्या विविध कलमांनुसार सध्या त्याची सविस्तर चौकशी सुरू आहे.

Bhusawal Railway Station Vada Seller Arrested
Bhusawal Bribe | अटक टाळण्यासाठी ३० हजारांच्या लाचेची मागणी; भुसावळचा फौजदार फरार

खाद्यपदार्थांचा 'तो' स्टॉल तात्पुरता सील!

रेल्वे प्रशासनाने या घटनेनंतर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मोठी कारवाई केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित खाद्यपदार्थांचा स्टॉल तात्पुरता बंद (सील) करण्यात आला आहे.

केवळ त्या वेंडरवरच नाही, तर या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार असलेल्या मुख्य परवानाधारकावरही (ठेकेदारावर) रेल्वेने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे.

कारणे दाखवा नोटीस जारी:

रेल्वे प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला 'कराराचा परवाना का रद्द करण्यात येऊ नये?', अशी थेट कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

स्पष्टीकरणाचे आदेश:

या अत्यंत गलिच्छ आणि गंभीर प्रकाराला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीबद्दल ठेकेदाराला स्पष्टीकरण देण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.

परवाना कायमचा रद्द होणार:

चालू असलेल्या चौकशीचा अंतिम निष्कर्ष आणि ठेकेदाराने सादर केलेले उत्तर समाधानकारक नसले, तर त्याचा परवाना कायमचा रद्द करण्यासह मोठी दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

Bhusawal Railway Station Vada Seller Arrested
Bhusawal Stolen Mobile Recovery | भुसावळ, मुक्ताईनगरमध्ये 15 लाखांचे 109 मोबाईल पोलिसांकडून मूळ मालकांना परत

नियम मोडल्यास थेट कारवाई; रेल्वेचा कडक इशारा

"प्रवाशांचे आरोग्य आणि सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असून यात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही," असा पुनरुच्चार भुसावळ रेल्वे विभागाने केला आहे. स्टेशन परिसरात कार्यरत असलेल्या सर्व अधिकृत स्टॉलधारकांना आणि विक्रेत्यांना स्वच्छता मानके, गुणवत्ता आणि परवान्याच्या अटींचे काटेकोर पालन करण्याचे कडक आदेश जारी करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही.

प्रवाशांना पुन्हा आवाहन: '१३९' वर तात्काळ कळवा!

स्टेशन परिसर किंवा रेल्वे गाड्यांमध्ये खाद्यपदार्थांची निकृष्ट गुणवत्ता, अस्वच्छता किंवा अनधिकृत विक्रेते (हॉकर्स) आढळल्यास प्रवाशांनी गप्प न बसता तात्काळ रेल्वे हेल्पलाईन '१३९' द्वारे किंवा संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी, जेणेकरून अशा विक्रेत्यावर वेळेवर आणि प्रभावी कारवाई करता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news