Bhusawal Stolen Mobile Recovery | भुसावळ, मुक्ताईनगरमध्ये 15 लाखांचे 109 मोबाईल पोलिसांकडून मूळ मालकांना परत

मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते ताब्यात देण्यात आले.
Bhusawal Muktainagar Stolen Mobile Recovery
मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते ताब्यात देण्यात आले Pudhari
Published on
Updated on

Bhusawal Muktainagar Stolen Mobile Recovery

जळगाव : भुसावळ व मुक्ताईनगर उपविभागामधील पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरामध्ये नागरिकांच्या मोबाईलची मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. याची उकल करीत पोलिसांनी 15 लाख किंमतीचे 109 मोबाईल जप्त केले होते. हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते ताब्यात देण्यात आले.

भुसावळ व मुक्ताईनगर परिसरामधील नागरिकांचे चोरीला गेलेले 109 मोबाईल जप्त करण्यात आले होते. 15 लाख 19 हजार 498 रुपये किमतीचे मोबाईल त्या त्या मोबाईल धारकांना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या हस्ते ताब्यात देण्यात आले.

Bhusawal Muktainagar Stolen Mobile Recovery
Jalgaon Students Isro Visit | विमानाने 'इस्रो'ची वारी, जळगावच्या आदिवासी पोरांची गरुडझेप

भुसावळ विभागामध्ये

भुसावळ शहर पोलीस स्टेशन अंतर्गंत 14 मोबाईल 1 लाख 71 हजार किमतीचे, बाजारपेठ पोलीस स्टेशन २२ मोबाईल 3 लाख 20 हजार रुपये, तालुका पोलीस स्टेशन मोबाईल तीन लाख रुपये, नशिराबाद पोलीस स्टेशन 12 मोबाईल एक लाख 53 हजार 998 असे एकूण 68 मोबाईल 9 लाख 44 हजार 498 रुपये किंमतीचे.

मुक्ताईनगर उपविभागामध्ये

पंधरा मोबाईल दोन लाख 25 हजार 14, आठ मोबाईल एक लाख रुपये, वरणगाव 18 मोबाईल, दोन लाख पन्नास हजार रुपयांचे असे एकूण 41 मोबाईल पाच लाख 75 हजार रुपये, मुक्ताईनगर व भुसावळ उपविभागातील परिसरांमधून नागरिकांची चोरीला गेलेले 109 मोबाईल जप्त करण्यात आलेले होते. त्यांची बाजार मूल्य 15 लाख 19 हजार 998 रुपये होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news