Bhusawal Bribe | 2 हजारांची लाच घेताना महावितरणचे कार्यकारी अभियंता 'एसीबी'च्या जाळ्यात

भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
 Bhusawal Mahadiscom Engineer Bribe
Bhusawal Mahadiscom Engineer BribeAI Photo
Published on
Updated on

Bhusawal Mahadiscom Engineer Bribe

जळगाव : भुसावळ शहर-१ महावितरण कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता (वर्ग-१) नितीन अभिमन्यु पाटील (वय ४९) यांना दोन हजार रुपयांची कथित लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी (दि.२२) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महावितरण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावावर सोलर सिस्टीम बसविण्याची एजन्सी असून भुसावळ शहरातील दोन ग्राहकांसाठी सोलर सिस्टीम बसविण्याची मंजुरी आणि 'रिलीज ऑर्डर' मिळविण्यासाठी महावितरणकडे ऑनलाइन अर्ज करण्यात आला होता. या दोन्ही प्रस्तावांवर मंजुरी देण्याची जबाबदारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांच्याकडे होती.

 Bhusawal Mahadiscom Engineer Bribe
Bhusawal Sub Registrar Office | भुसावळ सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या सुसज्ज इमारतीमुळे तत्पर सेवा उपलब्ध होणार

तक्रारदाराने कार्यालयात भेट दिल्यानंतर प्रत्येक प्रस्तावासाठी एक हजार रुपये, अशा एकूण दोन हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. तक्रारीची पडताळणी पंचांसमक्ष करण्यात आल्यानंतर एसीबीने सापळा रचला.

सापळा कारवाईदरम्यान नितीन पाटील यांनी तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 Bhusawal Mahadiscom Engineer Bribe
Bhusawal Nagar Parishad: अडीच तासांत 300 विषयांचा धडाका; सत्ताधाऱ्यांची 'बॅटिंग’, एलईडीचा 3 कोटींचा 'मलिदा' नाकारला

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांनी कारवाई केली. पथकात पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल संगीता पवार आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळू मराठे यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news