Bhusawal Sub Registrar Office | भुसावळ सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या सुसज्ज इमारतीमुळे तत्पर सेवा उपलब्ध होणार

वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते लोकार्पण
Bhusawal Sub Registrar Office
Bhusawal Sub Registrar Office Pudhari
Published on
Updated on

Bhusawal Sub Registrar Office

जळगाव : भुसावळ येथील तहसील कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या सह-दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नविन प्रशस्त इमारतीचे लोकार्पण राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. नव्या इमारतीमुळे नागरिकांना अधिक आधुनिक, सुसज्ज व कार्यक्षम सेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, मंदार पाठक, सहदुय्यम निबंधक नितीन सोनवणे यांच्यासह भुसावळ नगर पालिकेचे नगरसेवक,आदी उपस्थित होते.

Bhusawal Sub Registrar Office
Bhusawal Nagar Parishad: अडीच तासांत 300 विषयांचा धडाका; सत्ताधाऱ्यांची 'बॅटिंग’, एलईडीचा 3 कोटींचा 'मलिदा' नाकारला

यावेळी मंत्री संजय सावकारे यांनी नव्या इमारतीची पाहणी करून कार्यालयीन सुविधांचा आढावा घेतला. नागरिकांना दस्त नोंदणीसाठी अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा मिळणे आवश्यक असून, त्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले.

नवीन प्रशस्त इमारतीमुळे दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांची सोय होणार असून कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान आणि परिणामकारक होण्यास मदत होईल,असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Bhusawal Sub Registrar Office
Bhusawal crime news : भुसावळ शहर पुन्हा हादरले! 'ऑन ड्यूटी' कर्मचाऱ्याचा खून

उद्घाटनानंतर उपस्थितांनी नव्या इमारतीची पाहणी केली व उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांचे स्वागत केले. या नवीन इमारतीमुळे नागरिकांना अधिक दर्जेदार व सोयीस्कर शासकीय सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news