Jalgaon Crime | जळगाव हादरले: हात स्कार्फने बांधून बेदम मारहाण: अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; आरोपी जेरबंद

एमआयडीसी पोलिसांनी नराधम आरोपीच्या अवघ्या काही तासांत बेडया ठोकल्या
 Minor Girl Assault Case
Minor Girl Assault CasePudhari
Published on
Updated on

Jalgaon Minor Girl Assault Case

जळगाव : शहरातील अयोध्या नगर परिसरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिचे हात स्कार्फने बांधले आणि लाकडी काठीने बेदम मारहाण करत तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी नराधम आरोपीला अवघ्या काही तासांत बेडया ठोकल्या आहेत. तेजस गजानन हिरे (रा. पारगाव, ता. चोपडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १३) सकाळी ८ ते दुपारी १ च्या सुमारास आरोपी तेजस हिरे याने पीडित मुलगी आणि तिच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने पीडितेस धरणगाव तालुक्यातील पिंपरी येथे आपल्या आजीच्या घरी नेले. घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत त्याने पीडितेचे हात जबरदस्तीने स्कार्फने बांधले.

 Minor Girl Assault Case
Jalgaon crime news | भुसावळात 'गावठी कट्टा' नाचवणाऱ्या नाशिकच्या गबरुला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पीडितेने यावेळी आरोपीचा जोरदार प्रतिकार केला असता, संतापलेल्या आरोपीने तिला लाकडी काठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. "या प्रकाराबाबत जर आईला काही सांगितले तर तुम्हा दोघांनाही संपवून टाकीन," अशी धमकीही त्याने दिली.

पीडितेने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तातडीने जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आणि आरोपी तेजस हिरे याला मंगळवारी (दि. १४) पहाटे ४.३७ वाजता अटक केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) माधुरी बोरसे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news