Diesel Shortage Jalgaon | डिझेल टंचाईने शेतकरी हैराण; अमळनेरात वाळूच्या डंपरांना अडवून संताप व्यक्त

बाजार समितीचे माजी सभापती श्याम अहिरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रात्री रस्त्यावर उतरून वाळू वाहतूक करणारे डंपर अडवले
Amalner Farmers Protest
शेतकऱ्यांनी रात्री रस्त्यावर उतरून वाळू वाहतूक करणारे डंपर अडवले Pudhari
Published on
Updated on

Amalner Farmers Protest

जळगाव : जिल्ह्यात डिझेल आणि पेट्रोलच्या टंचाईमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरांना मात्र सहज इंधन उपलब्ध होत असल्याचा आरोप करत अमळनेरातील शेतकऱ्यांनी संतप्त आंदोलन छेडले. बाजार समितीचे माजी सभापती श्याम अहिरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रात्री रस्त्यावर उतरून वाळू वाहतूक करणारे डंपर अडवले आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

सध्या खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे सुरू असून, ट्रॅक्टरसाठी डिझेलची मोठी गरज आहे. मात्र, पेट्रोल पंपांवर तासनतास प्रतीक्षा करूनही शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामे रखडली आहेत. अशा परिस्थितीत अवैध वाळू वाहतुकीतील वाहनांना कोणतीही अडचण न येता डिझेल पुरवठा कसा होतो, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

Amalner Farmers Protest
Jalgaon news | महागाईचा 'इंधन' भडका! जळगावकरांच्या ताटातून भाजी गायब

आंदोलकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देताना नियम पुढे केले जातात, मग अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरांसाठी हे नियम लागू होत नाहीत का?” असा थेट सवाल केला.

रात्री उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांनी अवैध वाळू वाहतूक आणि इंधन पुरवठ्यातील कथित संगनमताची चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news