Jalgaon Accident | कालिंका माता चौकात डंपरने वृद्धाला चिरडले; संतप्त जमावाकडून तोडफोड

चौक बनला आहे अपघातप्रवण क्षेत्र, गेल्यावर्षी याच ठिकाणी झाला होता चिमुरडीचा अपघातात मृत्‍यू
Jalgaon Accident News
Jalgaon Accident News
Published on
Updated on

जळगाव- शहरात भरधाव डंपरने एका वृद्धाला चिरडल्याची हृदयद्रावक घटना कालिंका माता चौक परिसरात शुक्रवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. या भीषण अपघातात ५७ वर्षीय प्रभाकर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करत तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर रघुनाथ पाटील (वय ५७ रा. जुने जळगाव) हे बाजार करून भाजीपाला घेऊन घरी परतत होते. यावेळी कालिंका माता चौकातून जाणाऱ्या एका भरधाव डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डंपरचे चाक थेट त्यांच्या चेहऱ्यावरून गेल्याने त्यांचा जागीच अंत झाला. विशेष म्हणजे, अपघात घडला तेव्हा डंपर चालक मोबाईलवर बोलण्यात व्यस्त होता, ज्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात घडला.

अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. गेल्या वर्षी याच ठिकाणी एका चिमुकल्याचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाला होता, त्या आठवणी ताज्या झाल्याने नागरिकांचा संयम सुटला. संतप्त जमावाने अपघातग्रस्त डंपरच्या काचा फोडून त्याचे नुकसान केले. वाढता तणाव पाहता दंगा नियंत्रण पथक आणि शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली.

कालिंका माता चौक हा अपघातप्रवण क्षेत्र बनला असून येथे तातडीने अद्ययावत सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. तसेच या चौकात २४ तास वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, जेणेकरून अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहील, अशी आग्रही मागणी ललित नारखेडे व स्थानिक नागरिकांनी केली आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news