जळगाव : रावेर वनपरिक्षेत्राच्या कारवाईत 5.73 लाखांचा अवैध लाकूडसाठा जप्त

Illegal timber seized: रावेर-चोरवड मार्गावर मौजे लोणी गावाजवळ कारवाई
Illegal timber seized
जप्त केलेल्या अवैध लाकूडसाठ्यासह वन अधिकारी.pudhari photo
Published on
Updated on

Illegal timber seized in Raver

जळगाव : रावेर वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सुमारे 5.73 लाख रुपयांचा अवैध लाकूडसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई रावेर-चोरवड मार्गावर मौजे लोणी गावाजवळ करण्यात आली.

दि. 5 मे रोजी गस्तीदरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, रावेर-चोरवड रस्त्यावर संशयित वाहने अडवण्यात आली. यात MH04CU5418 क्रमांकाचा आयशर ट्रक व MH19Z7862 क्रमांकाचा ट्रॅक्टर आढळून आला. दोन्ही वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही परवानगी न घेता पंचरास जातीचे एकूण 31 घनमीटर लाकूड आढळून आले.

एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 5,73,400 रुपये इतकी होते. हा गुन्हा मध्य प्रदेश राज्याच्या हद्दीत घडलेला असल्याने रावेर वनविभागाने तत्काळ मध्य प्रदेश वनविभागाशी संपर्क साधून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले.

या कारवाईत जप्त केलेली दोन्ही वाहने व लाकूडसाठा पुढील कार्यवाहीसाठी वनपाल युनुस दाऊदी, वनरक्षक आर. डी. काजळे, वनरक्षक वीरेंद्र कुमार या मध्य प्रदेश वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आली.

Illegal timber seized
Mahadev Jankar Meets Rahul Gandhi: रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिल्लीत घेतली राहुल गांधींची भेट

ही कारवाई नीनू सोमराज, वनसंरक्षक (प्रा.) (वनवृत्त धुळे) जमीर शेख, उपवनसंरक्षक (यावल) आर. आर. सदगीर, विभागीय वन अधिकारी (दक्षता, धुळे) व समाधान पाटील, सहा. वनसंरक्षक (यावल) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या मोहिमेत वनपाल अरविंद धोबी (सहस्त्रलिंग), वनरक्षक आयेशा पिंजारी (अहिरवाडी), सविता वाघ (पाडले खु.), जगदीश जगदाळे (जुनोना), वनमजूर सुभाष माळी आणि वाहनचालक विनोद पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news