Jalgaon illegal sand: अवैध वाळूवर पोलिसांच्या कारवाईचा बडगा; सात ब्रास वाळू जप्त

जळगाव शहरासह जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक होत आहे. नशिराबाद, पाचोरा, अडावद आणि मेहुणबारे येथे केलेल्या कारवाईत सात ब्रास वाळू जप्त करण्यात आली.
Sand
SandFile Photo
Published on
Updated on

Jalgaon illegal sand

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील वाळूचे असलेले 11 ठेके शासनाच्या नियमानुसार बंद करण्यात आलेले आहेत. मात्र, अजूनही शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक होत आहे. यावर पोलिस प्रशासनाने पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे. दि. 24 रोजी नशिराबाद, पाचोरा, अडावद आणि मेहुणबारे येथे केलेल्या कारवाईत सात ब्रास वाळू जप्त करण्यात आली. तसेच 19 लाख 83 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी नऊ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे एक डंपर (क्रमांक एमएच 27 बीएक्स 2260) आणि त्यामध्ये दोन ब्रास, आठ हजार रुपये किमतीची वाळू, असा एकूण 3 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी जयराम ताराचंद कोळी आणि अनिल भागवत सपकाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sand
Jalgaon accident: ट्रान्सपोर्ट नगरमध्ये भीषण अपघात: विरुद्ध दिशेने आलेल्या बोलेरोला चुकवताना ITI विद्यार्थ्याचा मृत्यू

पाचोरा येथे ट्रॅक्टर (क्रमांक एमएच 12 व्हीए 5401) आणि त्यामधील दीड ब्रास वाळू असा एकूण 6 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सुरज उर्फ बुलेट भरत पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अडावद येथे विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून दीड ब्रास वाळू जप्त करण्यात आली. याप्रकरणी एकूण 3 लाख 7 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संजय यादव ठाकरे आणि ज्ञानेश्वर बाविस्कर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

मेहुणबारे पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी एका गुन्ह्यात विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर आणि त्यामधून एक ब्रास वाळू असा एकूण 3 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी किशोर तुकाराम पावरा आणि गणेश धनराज पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या गुन्ह्यात ट्रॅक्टर (क्रमांक एमएच 19 डीव्ही 7295) आणि त्यामधील वाळू जप्त करण्यात आली असून, 3 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरेश लालसिंग पावरा आणि भीमसिंह कैलास ठोके या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Sand
Jalgaon accident: कावड यात्रेदरम्यान भरधाव ट्रकने ८ वर्षांच्या चिमुकल्याला चिरडले; संतप्त जमावाने ट्रक पेटवला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news