

जळगाव : HMPV या व्हायरसचा संभाव्य धोका टाळण्यासाठी जळगाव जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही रुग्णालय तयारीनिशी सज्ज ठेवण्यात आलेले आहेत. जळगाव महाविद्यालयामध्ये 20 बेड जास्तीचे कक्ष,14 बेड, पी आय सी यु व 36 बेड एन आय सी यु असे एकूण 70 बेड तयार ठेवण्यात आले आहेत.
HMPV या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मंगळवार (दि.7) रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी महाराष्ट्र राज्याच्या महाविद्यालयाच्या अधिष्ठानची ऑनलाइन बैठक घेतली. यावेळी तज्ज्ञांनी सादर केलेल्या प्रेझेंटेशनमध्ये HMPV व्हायरस 2001 व त्यापूर्वीही भारतात आयडेंटिफिकेशन झालेले असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणेला अलर्ट ठेवण्यात आले असून कोणीही सुट्टी घेऊ नये अशा सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर काळजी जरी नसली तरी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
रुग्णाच्या तपासणी संदर्भात सुद्धा उपाययोजना करण्यात आलेले आहेत. आपल्याकडे स्व्याब तपासणी करण्यात येईल जर रुग्णांची संख्या वाढली तर तपासणीसाठी स्व्याब पुण्याला पाठवण्यात येतील. HMPV व्हायरस तपासणी ही पूर्वीप्रमाणेचे स्व्याब घेऊन तपासणी करता येत आहे. रुग्ण आढळल्यास त्याचा स्व्याब घेऊन एन आय यू पुणे या ठिकाणी तपासणीसाठी पाठवण्यात येईल. महाविद्यालयाचेही पीसीआरजी यंत्रणा ठिकाणीही याबाबत सोय करण्यात आली आहे.
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवजात बालक आणि मुलांसाठी 40 बेड उपलब्ध असून स्वतंत्र 20 बेड असलेला कक्ष जास्तीचे तयार ठेवण्यात आले आहेत. 14 बेड पीआयसीयु तसेच 36 बेड एनआयसीयु अशा पद्धतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची तयारी करण्यात आली आहे.
डॉ.गिरीश ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय.
जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालय 3, ग्रामीण रुग्णालय 20 आणि प्राथमिक आरोग्य केंद्र 77 असून त्यांनाही अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
किरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक.